Mumbai's Technician Max; Created robot to treat corona patients

कोरोना रुग्णांवर चांगले उपचार करण्यामध्ये अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या सर्व समस्या लक्षात घेऊन मुंबईतील एका तंत्रज्ञाने तीन रोबो विकसित केले आहेत. हे रोबो कोरोना रुग्णांवरील उपचारांसाठी मदतगार ठरणार आहेत. भारतात कोरोनाची दुसरी लाट ओसरली असून, आता देशातील कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने कमी होत आहे.

    मुंबई : कोरोना रुग्णांवर चांगले उपचार करण्यामध्ये अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या सर्व समस्या लक्षात घेऊन मुंबईतील एका तंत्रज्ञाने तीन रोबो विकसित केले आहेत. हे रोबो कोरोना रुग्णांवरील उपचारांसाठी मदतगार ठरणार आहेत. भारतात कोरोनाची दुसरी लाट ओसरली असून, आता देशातील कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने कमी होत आहे.

    कोरोनामुळे होणारे मृत्यूही कमी होऊ लागले आहे. मात्र कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान रुग्णालयांमध्ये बेडपासून ऑक्सिजनपर्यंत सर्वांची टंचाई दिसून येत आहे. अशा परिस्थितीत कोरोना रुग्णांवर चांगले उपचार करण्यामध्ये अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. हे रोबो कोरोनाच्या साथीदरम्यान रुग्णांवर उपचार करण्यात मदत करतील, असा दावा त्याने केला आहे.

    हे तीन रोबो तयार करणाऱ्या तंत्रज्ञाचे नाव संतोष हुलावले आहे. त्यांनी या तिन्ही रोबोंचे प्रेझेंटेशनही दिले आहे. या तीन रोबोंची नावे एसएचआर, एमएसआर आणि डीएमआर अशी आहेत. हे रोबो दिसायला खूप आकर्षक आहेत. हे तिन्ही रोबो कोरोनाच्या संसर्गामध्ये उपचारांबरोबरच गॅस लिक होणे तसेच आग लागण्यासारख्या अपघातांमध्येही मदतीसाठी फायदेशीर ठरतील, असा दावा संतोष हुलावले यांनी केला आहे.

    हे सुद्धा वाचा