स्टार्ट अपसाठी जगातील सर्वोत्तम शहरांत मुंबईची कमाल; औरंगाबाद शहराचा १००० शहरांमध्ये नव्यानेच समावेश

StartupBlinkने नुकतीच Startup Ecosystem Ranking 2021 अहवाल जाहीर केली असून औरंगाबाद शहराचा जगातील पहिल्या १००० शहरांमध्ये नव्यानेच समावेश झाला आहे. २०२१ सालच्या रँकिंगमध्ये औरंगाबाद जगात ८८५व्या क्रमांकावर आहे. देशात औरंगाबादचा ३६वा नंबर आणि दक्षिण आशियामध्ये ४२वा नंबर येतो.

    मुंबई : स्टार्टअप ब्लिंक (Startup Blink Website survey) नावाच्या वेब साइटनं जगातील सर्वोत्तम  १००० शहरांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये भारतातील ४३ शहरांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील काही शहरांचा समावेश करण्यात आला आहे. तर देशाची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबई (Mumbai) शहरानं या यादीत पहिल्या काही शहरांत आपलं स्थान कायम ठेवलं आहे.

    StartupBlinkने नुकतीच Startup Ecosystem Ranking 2021 अहवाल जाहीर केली असून औरंगाबाद शहराचा जगातील पहिल्या १००० शहरांमध्ये नव्यानेच समावेश झाला आहे. २०२१ सालच्या रँकिंगमध्ये औरंगाबाद जगात ८८५व्या क्रमांकावर आहे. देशात औरंगाबादचा ३६वा नंबर आणि दक्षिण आशियामध्ये ४२वा नंबर येतो.

    या अहवालात तीन पॅरॅमिटर्ससाठी स्कोअर विभागले आहेत, ज्यात मात्रा, गुणवत्ता आणि व्यवसाय वातावरण असे तीन मापदंडांची बेरीज केली जाते. औरंगाबाद शहर मागील काही वर्षात शैक्षणिक आणि औद्योगिक हब म्हणून मोठ्या प्रमाणावर पुढे आले आहे.

    स्थानिक औद्योगिक संस्थेच्या माध्यमातून मॅजिक सारखी संस्था असो, किंवा विद्यापीठ आणि महाविद्यालयाच्या पुढाकार्ने येथे इंक्युबेशन सेंटर्सची उभारणी झाली आहे, याच्या मदतीने स्टार्टअप्स पुढे येण्यास सुरुवात झाली आहे.