लग्नाचं अमिष दाखवून मुंडेंनी केली फसवणूक, रेणू शर्मा यांचा खळबळजनक आरोप

रेणू शर्मा यांनी मंगळवारी (१२ जानेवारी) धनंजय मुंडे यांनी बलात्कार केल्याचा आरोप करत ओशिवारा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीत मुंडे यांनी लग्नाचं अमिष दाखवून फसवणूक केली. तसेच बलात्कार करून शारीरिक शोषण केल्याचा खळबळजनक आरोप शर्मा यांनी केला आहे.

मुंबई : गायिका रेणू शर्मा यांनी राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात बलात्काराची तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली आहे. मागील काही दिवसांपासून ट्विटर तसेच इतर समाज माध्यमांवर रेणू शर्मा यांना धनंजय मुंडेंनी ब्लॉक केलं होत, याचा जाब विचारण्याचा सल्ला त्यांनी टीकाकारांना दिला आहे. रेणू शर्मा यांनी मंगळवारी (१२ जानेवारी) धनंजय मुंडे यांनी बलात्कार केल्याचा आरोप करत ओशिवारा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीत मुंडे यांनी लग्नाचं अमिष दाखवून फसवणूक केली. तसेच बलात्कार करून शारीरिक शोषण केल्याचा खळबळजनक आरोप शर्मा यांनी केला आहे.

पोलीस सहकार्य करत नसल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. तसेच, समाज माध्यमांवार दिवसभर याच गोष्टीची चर्चा सुरू होती. या प्रकारानंतर काहींनी धनंजय मुंडे यांच्यावरचे आरोप खोटे असल्याचे सांगत त्यांचे समर्थन केले. तर काहींनी रेणू शर्मा यांची बाजू घेत त्यांना न्याय देण्याची मागणी केली. त्यानंतर रेणू शर्मा यांनी सलग ट्विट करत पुन्हा काही प्रश्न उपस्थित केले.

रेणू शर्मा यांचे ट्विट काय?

धनंजय मुंडे यांनी मला ट्विटरसहीत सगळीकडे ब्लॉक करण्यामागचं कारण काय?, असा सवाल रेणू यांनी केला. तसेच, पोलिसात तक्रार दाखल करताच मुंडे यांनी पुन्हा अनब्लॉक केल्याचंही शर्मा यांनी म्हटलंय. या प्रकरणाचा पोलीस जेव्हा सखोल तपास करतील तेव्हा सगळं काही समोर येईलच असं म्हणत त्यांनी या ट्विटमध्ये त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना टॅग केले आहे.