सामाजिक न्यायमंत्री कोरोनातून झाले मुक्त, आज मिळाला डिस्चार्ज

मुंबई : राज्याच्यासामाजिक न्याय मंत्र्यांना आज दुपारी ब्रीच कँडी रुग्णालयातून चार वाजण्याच्या सुमारास डिस्चार्ज देण्यात आला.मागील अकरा दिवसांपासून ते या रुग्णालयात कोरोनाच्या आजारामुळे

मुंबई : राज्याच्या सामाजिक न्याय मंत्र्यांना आज दुपारी ब्रीच कँडी रुग्णालयातून चार वाजण्याच्या सुमारास डिस्चार्ज देण्यात आला. मागील अकरा दिवसांपासून ते या रुग्णालयात कोरोनाच्या आजारामुळे दाखल होते . दोन दिवसांपूर्वीच त्यांची दुसरी टेस्ट निगेटिव्ह आल्यानंतर आज त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. रुग्णालयातून बाहेर पडताना त्यांनी हात उंचावून आणि हात जोडून रुग्णालयातील सर्व डॉक्टर्स नर्स आणि इतर कर्मचाऱ्यांचे आभार व्यक्त केले.मंत्र्यांच्यासोबत कोरोनाची लागण झालेले त्यांचे खाजगी सचिव तसेच आणखी एक स्वीय सहाय्यक दोन वाहन चालक एक अंगरक्षक यांनाही रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला असून सर्वांची दुसरी चाचणीही निगेटिव्ह आली आहे .आता केवळ एक अंगरक्षक व एक कुक हे दोघेच जण रुग्णालयात उपचार घेत असून त्यांची प्रकृतीही सुधारत आहे