Municipal administration responsible for cyclone damage; BJP will file a petition

चक्रीवादळामुळे मुंबई शहरात २ हजार ३६४ वृक्ष उन्मळून पडले. वृक्षांच्या छाटणीसाठी मार्च किंवा एप्रिल महिन्यात कंत्राटदार नेमले असते तर एवढी माेठी वृक्ष हानी झाली नसती. त्यामुळे प्रशासनाच्या विराेधात मुंबई महापालिकेवर सदोष वृक्षवधाचा गुन्हा दाखल करण्याची आणि या प्रकरणी उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याची तयारी भाजपना दर्शविली आहे.

  मुंबई : चक्रीवादळामुळे मुंबई शहरात २ हजार ३६४ वृक्ष उन्मळून पडले. वृक्षांच्या छाटणीसाठी मार्च किंवा एप्रिल महिन्यात कंत्राटदार नेमले असते तर एवढी माेठी वृक्ष हानी झाली नसती. त्यामुळे प्रशासनाच्या विराेधात मुंबई महापालिकेवर सदोष वृक्षवधाचा गुन्हा दाखल करण्याची आणि या प्रकरणी उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याची तयारी भाजपना दर्शविली आहे.

  वादळाने माेठ्या प्रमाणात झालेल्या झाडांच्या पडझडीला भाजपने आज स्थायी समितीत प्रशासनाला जबाबदार धरले आणि निषेध नाेंदविला.
  वादळानंतर ४८ तास उलटूनही रस्त्यावर पडलेल्या वृक्षांच्या फांद्या हटविण्यात आलेल्या नाहीत. याबाबत उद्यान विभागाकडे विचारणा केली असता हे काम करण्यासाठी कंत्राटदाराची नियुक्ती झाली नसल्याचे सांगण्यात आले.

  गेल्या ३ महिन्यापासून वृक्ष छाटणीसाठी कंत्राटदाराच्या नियुक्तीचा प्रस्ताव वृक्ष प्राधिकरण समिती समोर १८ मार्च २०२१ पासून अजूनली प्रलंबित आहे. याला जबाबदार कोण? असा सवाल भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी स्थायी समितीत केला. येत्या आठवडाभरात वृक्ष प्राधिकरणामध्ये वृक्ष छाटणीच्या प्रस्तावास मंजुरी देऊन प्रत्यक्ष वृक्ष छाटणीस प्रारंभ केला नाही. त्यामुळे मुंबई महापालिका प्रशासनावर सदोष वृक्षवधाचा गुन्हा दाखल करून याप्रकरणी उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याची ठाम भुमिका बुधवारी शिंदे यांनी स्थायी समितीत घेतली.

  ४८ तास उलटूनही फांद्या रस्त्यांवरच

  तोक्ते चक्रीवादळाला सामोरे जाण्यासाठी पालिका प्रशासन सज्ज असल्याचा केवळ देखावा करण्यात आला. चक्रीवादळासारखी नैसर्गिक आपत्तीत पालिका प्रशासनाच्या मनुष्यबळाच्या मर्यादा दिसून आल्या. वादळानंतर ४८ तासांचा कालावधी लोटूनही रस्त्यावर पडलेल्या मोठ्या वृक्षांच्या फांद्या बाजूला करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे वाहतुकीला अडचण होत आहे. नैसर्गिक आपत्तीला सामोरे जाताना उद्यान विभागाकडे पुरेसे मनुष्यबळ, मोठी झाडे कापण्यासाठी साधनसामुग्री, विद्युत करवती उपलब्धच नाहीत. इतकंच नाही तर रस्त्यावरिल पालापाचोळा उचलण्यासाठी यंत्रणाच तोकडी पडल्याचे चित्र आहे, असा पाेलखाेल शिंदे यांनी केला.

  पालिकेच्या वर्तनाचा निषेध

  वृक्ष छाटणीसाठी मार्च एप्रिल मध्ये कंत्राटदार नेमले असते तर वृक्षांचे असे नुकसान झाले नसते. वेळेत वृक्षछाटणी झाली असती. वृक्ष प्राधिकरण समितीच्या या अक्षम्य विलंबामुळे मुंबई शहर हजारो मोठ्या आणि प्राचीन वृक्षांना आपण मुकलाे आहाेत. तसंच मोठ्या प्रमाणात वित्तहानी, गाड्यांची नासधूस झाली आहे. पालिकेच्या या बेजबाबदार वर्तनाचा तीव्र निषेध भाजपच्या सदस्यांनी स्थायी समितीत केला.