म्युकरमायकोसिस बुरशीच्या वेगवेगळ्या रंगावर पालिकेचे लक्ष ; बुरशीचे प्रकार ओळखण्यासाठी डॉक्टरांचे विशेष पथक

देशातील काही राज्यात काळ्या बुरशीसह पांढ-या आणि पिवळ्या बुरशीचा प्रकार आढळत आहे. यादृष्टीनेही लक्ष प्रशासनाकडून लक्ष वेधण्यात आले आहे. यावर डॉक्टरांची चर्चा करण्यात आली असून याकडे बारकाईने लक्ष दिले जात आहे. म्यूकरमायकोसिस या आजाराचा सामना करण्याच्यादृष्टीने तयारी केली जाते आहे.

    मुंबई – कोरोनाच्या संसर्गा विरोधात संघर्ष सुरु असताना आता म्यूकरमायकोसिस आजार वाढतो आहे. देशातील इतर राज्यात वेगवेगळे म्युकरमायकोसिस बुरशीचे नवीन रंग आढळत असले तरी मुंबईत मात्र सध्या फक्त काळ्या बुरशीच्या संसर्गाचा प्रकार आढळत आहे. मात्र बुरशीच्या बदलणा-या रुपांकडे लक्ष देऊन उपचार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. बुरशीचे प्रकार ओळखण्यासाठी डॉक्टरांचे विशेष पथक पालिकेने तैनात केले आहे.

    मुंबईत म्युकरमायकोसिसचे रुग्ण आढळले आहेत. काही रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. अशा रुग्णांना वॉर्ड वॉर रुममधून संपर्क केला जात आहे. तसेच, म्युकरमायकोसीसच्या उपचारांसाठी डॉक्टरांना विशेष प्रशिक्षण दिले गेले आहे. कोविड असताना किंवा कोविडनंतर जर कोणालाही त्रास झाला तर तात्काळ उपचारांसाठी रुग्णालयांमध्ये दाखल करून घ्यावे, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.

    रुग्णालयांमध्ये दाखल असलेल्या रुग्णांची माहिती पालिकेतर्फे संकलित केली जात आहे. या रुग्णांना आवश्यक औषधोपचार पालिकेकडून पुरवले जाणार आहेत. बुरशीचे प्रकार आणि त्यावर उपचार काय यासाठी डॉक्टरांच्या पथकाला बुरशीचे प्रकार ओळखण्याची सूचनाही देण्यात आली आहे. मुंबईत आतापर्यंत पिवळ्या किंवा सफेद बुरशीच्या रूग्णांची नोंद झालेली नसल्याचे पालिकेच्या आरोग्य विभागातून स्पष्ट करण्यात आले. आतापर्यंत रुग्णालयांमध्ये म्युकरमायकोसिसचे जवळपास २५० हून अधिक रुग्ण दाखल असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

    देशातील काही राज्यात काळ्या बुरशीसह पांढ-या आणि पिवळ्या बुरशीचा प्रकार आढळत आहे. यादृष्टीनेही लक्ष प्रशासनाकडून लक्ष वेधण्यात आले आहे. यावर डॉक्टरांची चर्चा करण्यात आली असून याकडे बारकाईने लक्ष दिले जात आहे. म्यूकरमायकोसिस या आजाराचा सामना करण्याच्यादृष्टीने तयारी केली जाते आहे.

    यासाठी डॉक्टरांचे विशेष पथक बुरशीच्या रंगांसह रूग्णांचीही बारकाईने तपासणी केली जाते आहे. म्युकरमायकोसिसची लक्षणे आढळल्यास जवळच्या डॉक्टरांशी संपर्क साधून सल्ला घ्या असे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आले आहे.