महापालिका १२०० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर खरेदी करणार; बाजारभावापेक्षा १५ ते २० हजारांनी अधिक खर्च

मुंबई महापालिका (Mumbai Municipal Corporation) कोरोना रुग्णालये (Corona Hospitals) आणि कोरोना उपचार केंद्रांसाठी (Corona Treatment Centers) तब्बल १२०० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. चीनी बनावटीचे कॉन्सन्ट्रेटरसाठी असणार आहे. एका कॉन्सन्ट्रेटरसाठी ७९ हजार खर्च केला जाणार असून बाजारभावापेक्षा प्रत्येकी तब्बल १५ ते २० हजार रुपये अधिक दराने ही खरेदी केली जाणार आहे.

    मुंबई (Mumbai).  मुंबई महापालिका (Mumbai Municipal Corporation) कोरोना रुग्णालये (Corona Hospitals) आणि कोरोना उपचार केंद्रांसाठी (Corona Treatment Centers) तब्बल १२०० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. चीनी बनावटीचे कॉन्सन्ट्रेटरसाठी असणार आहे. एका कॉन्सन्ट्रेटरसाठी ७९ हजार खर्च केला जाणार असून बाजारभावापेक्षा प्रत्येकी तब्बल १५ ते २० हजार रुपये अधिक दराने ही खरेदी केली जाणार आहे. आज या प्रस्तावाला स्थायी समितीने मंजुरी (the Standing Committee) दिली आहे.

    कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वाढणा-या रुग्णसंख्येचा विचार करून पालिकेने प्रती मिनिट दहा लिटर क्षमतेचे १२०० काॅन्सन्ट्रेटर खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. या खरेदीसाठी श्रद्धा डिस्ट्रिब्युटर या कंपनीची निवड करण्यात आली आहे. पालिका यासाठी कंत्राटदाराला १० कोटी ४२ लाख रुपये मोजणार आहे. चीनी बनावटीचे हे काॅन्सन्ट्रेटर असून प्रशासनाने चढ्या दराने खरेदी केले असल्याचा दावा विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केला आहे.

    दोन वर्षांपूर्वी चीनी बनावटीचे काॅन्सन्ट्रेटर ३० ते ४५ हजारांपर्यंत मिळत होते. तसेच नामवंत कंपन्यांचे काॅन्सन्ट्रेटर मिळत असताना पालिकेने चढ्या दराने खरेदी केले असल्याचा आरोप राजा यांनी केला आहे. दरम्यान पहिल्या टप्प्यात ३०० काॅन्सन्ट्रेटरचा पुरवठा २६ मेपर्यंत केला जाणार असल्याचे वितरकाने पालिकेला कळवले आहे. प्रस्ताव शुक्रवारी २८ मे रोजी मंजूर झाल्याने पुरवठा कधी करणार असा प्रश्न उपस्थित केला जातो आहे.