महापालिकेची अनलॅाक नियमावली जारी,  मुंबईकरांना लोकल सेवेसाठी  पाहावी लागणार वाट

सर्वसामान्य नागरिकांना लोकलसाठी आणखी थोडी वाट पाहावी लागणार आहे. त्यामुळे आधीच्या गाईडलाईनप्रमाणे केवळ अत्यावश्यक सेवेकरिताच लोकल प्रवासास परवानगी असणार आहे. 

  मुंबई:  महापालिकेने सोमवार ते शुक्रवार करिता अनलॅाकची नियमावली जारी केली आहे. राज्य सरकारने जारी केलेल्या निकषानुसार मुबंई लेवल तीनमध्ये आहे. मुंबईचा आताचा पॉझिटिव्हिटी रेट ५.३० टक्के आहे. पुढच्या आठवड्यात पॉझिटिव्हिटी रेटमध्ये सुधारणा होईल अशी अपेक्षा आहे. त्यामुळे पुढच्या आठवड्यापर्यंत तरी मुंबईची लाईफ लाईन लोकल सेवा सुरु होणार की नाही याची सर्वजण वाट पाहत आहेत. मात्र सर्वसामान्य नागरिकांना लोकलसाठी आणखी थोडी वाट पाहावी लागणार आहे. त्यामुळे आधीच्या गाईडलाईनप्रमाणे केवळ अत्यावश्यक सेवेकरिताच लोकल प्रवासास परवानगी असणार आहे.

  लेवल तीनमध्ये काय सुरु काय बंद?

  • या निकषानुसार मुंबईत उद्या सोमवारपासून अत्यावश्यक सेवेतील दुकाने जैसे थे म्हणजे ७ ते २ वाजेपर्यंत आणि इतर दुकाने सोमवार ते शुक्रवार ७ ते २ वाजेपर्यंत सुरू राहतील अत्यावश्यक सेवा वगळता शनिवार आणि रविवार बंद राहतील.
  • मॉल्स आणि सिनेमागृह पूर्णपणे बंद राहतील.
  • हॉटेल्स ५० टक्के क्षमतेने सकाळी ७ ते २ वाजेपर्यंत खुली रहातील. दुपारी २ नंतर पार्सल सेवा सुरू राहिल. शनिवार आणि रविवार बंद राहतील.
  •  सार्वजनिक उद्याने, मैदाने, वॉकिंग ट्रॅक, सायकलिंग ट्रॅक सकाळी ५ ते ९ यावेळेत सुरू रहातील.
  • खाजगी आणि सरकारी कार्यालयात ५० टक्के क्षमतेने उपस्थिती राहील.
  •  इंडोर खेळले जाणारे स्पोर्ट्स बंद राहतील.
   सिनेमा चित्रीकरणाला स्टुडीओमध्ये परवानगी असेल.
  •  सामाजिक, सांस्कृती, मनोरंजनात्मक कार्यक्रमाला ५० टक्के क्षमतेने दुपारी २ वाजेपर्यंत परवानगी राहील (सोमवार ते शुक्रवार).
  • लग्न सोहळे ५० जणांची उपस्थिती, अंत्यसंस्कार २० जणांची उपस्थिती, इतर बैठका ५० टक्के उपस्थित राहील.
  • कृषी क्षेत्रातील कामांना आणि ई कॉमर्स, बांधकाम क्षेत्रातील कामांना दुपारी २ वाजेपर्यंत परवानगी राहील, दुपारी २ वाजल्यानंतर जमावबंदी कायम राहील