मुंबईतील असंसर्गजन्य आजारासाठी पालिकेचा पुढाकार, पालिका करणार सर्व्हे

या सर्व्हेक्षणाच्या माध्यमातून मुंबईकरांमध्ये असंसर्गजन्य आजाराचे प्रमाण किती आहे याची माहिती मिळेल. त्याचप्रमाणे त्यावर नियंत्रण कसे मिळवायचे यावर उपाय शोधण्यात येणार आहेत.

    मुंबईवर कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे सावट असताना अजूनही मुंबईत कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे मुंबईमध्ये किती नागरिकांना कोणते असंसर्गजन्य आजार आहेत याचा सर्व्हे महापालिकेडून करण्यात येणार आहे.

    मुंबईत इतर उपाययोजनांसाहित आता मधुमेह आणि उच्च रकतदाब असणाऱ्या रूग्णांचा देखील सर्व्हे करण्यात येणार आहे. पुढील आठवडयात हे सर्व्हेक्षण सुरु केले जाणार असून जागतिक आरोग्य संघटनेच्या मदतीने ही कार्यवाही करण्यात येणार आहे. यामध्ये मधुमेह, हायपरटेन्शन, कॅन्सर तसेच स्ट्रोक या आजारांची माहिती घेतली जाणार आहे.

    या सर्व्हेक्षणामध्ये आधी एकूण सहा हजार लोकांची माहिती घेण्यात येणार असून तीन टप्प्यांमध्ये हे सर्व्हेक्षण करण्यात येईल. 18 ते 69 वयोगातील लोकांचा यामध्ये समावेश असणार आहे. सर्व्हेक्षणाच्या या पहिल्या टप्प्यांत मुलाखती घेण्यात येणार आहेत. त्यानंतर नागरिकांचे बॉडी मास इंडेक्स तपासला जाईल व यानंतर तिसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यात रक्त चाचणी किंवा लघवीचा तपास करण्यात येणार आहे.

    या सर्व्हेक्षणाच्या माध्यमातून मुंबईकरांमध्ये असंसर्गजन्य आजाराचे प्रमाण किती आहे याची माहिती मिळेल. त्याचप्रमाणे त्यावर नियंत्रण कसे मिळवायचे यावर उपाय शोधण्यात येणार आहेत.