नव उदयोजकांना प्रोत्साहन देण्यासाठी पालिकेचे नवे तंत्रज्ञान

स्माईल सेंटरच्या माध्यमातून निवडण्यात येणाऱ्या नव उद्योजकांना त्यांचे तंत्रज्ञान, वस्तू, उपकरण इत्यादी महानगर पालिकेच्या संबंधीत खात्यांमध्ये उपयोगात आणण्याची संधी प्रदान केली जाणार आहे. अशा प्रकारचे प्रोत्साहन दिल्याने या नव उद्योजकांना त्यांचे उद्योग वाढीसाठी प्रोत्साहन मिळेल.

    मुंबई – आधुनिक नागरी तंत्रज्ञानाचा उपयोग करुन नागरिकांना उपयुक्त अशा वस्तू,उपकरणे आणि तंत्रज्ञान प्रत्यक्षात आणणाऱ्या नव उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी महानगरपालिकेने “सोसायटी फॉर मुंबई इनक्यूबेशन लॅब टू आंत्रप्रेन्योरशिप (स्माईल) कॉन्सिल”बिझनेस इनक्युबेशन सेंटर ही सुविधा सुरू केली आहे.या केंद्राच्या माध्यमातून प्रोत्साहन देण्यात आलेली ५ नव उद्यमींची पहिली तुकडी महानगर पालिकेच्या विभागांसोबत मिळून कामकाज करण्यास सज्ज झाली आहे.

    स्माईल सेंटरच्या माध्यमातून निवडण्यात येणाऱ्या नव उद्योजकांना त्यांचे तंत्रज्ञान, वस्तू, उपकरण इत्यादी महानगर पालिकेच्या संबंधीत खात्यांमध्ये उपयोगात आणण्याची संधी प्रदान केली जाणार आहे. अशा प्रकारचे प्रोत्साहन दिल्याने या नव उद्योजकांना त्यांचे उद्योग वाढीसाठी प्रोत्साहन मिळेल.

    या उद्देशानुसार नव उद्यमींची पहिली तुकडी निश्चित करण्यात आली असून त्यामध्ये ५ नव उद्यमींचा समावेश आहे. प्रायोगिक तत्त्वावर ते संबंधीत वस्तू, उपकरण, तंत्रज्ञान उपयोगात आणणार आहेत. आय.आय.टी. मुंबई अंतर्गत साइन बिझनेस इनक्युबेशन सेंटरच्या संयुक्त विद्यमानाने महानगरपालिकेच्या स्माईल कौन्सिलने आपल्या पहिल्या तुकडीमध्ये या सर्व उद्योजकांचा समावेश केला आहे.