Kidney transplantation successful despite blood group separation; The first surgery at Nair Hospital

नागरिक काेराेना नियमांचे पालन करत नसल्याने ही रुग्णवाढ दिवसेंदिवस हाेत असल्याचे आराेग्य विभागाचे म्हणणे आहे. त्यामुळे काेराेनासाठी पुन्हा बेड सज्ज ठेवण्याचे आदेश पालिका आराेग्य विभागाकडून देण्यात आले आहेत. पण यावेळी पालिका आराेग्य विभागाने काेविड रुग्णांची वर्गवारी केली असून या वर्गवारी प्रमाणेच पालिकेच्या तीन प्रमुख रुग्णालयात रुग्ण दाखल हाेणार असल्याचे वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

  नीता परब, मुंबई: मुंबईत मागील काही दिवसांपासून काेरोना रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहेत. काेराेनामुळे हाेणाऱ्या मृत्युची संख्या कमी असली तरीही, रुग्णसंख्येत मात्र दिवसागणिक वाढ हाेत असल्याचे निदर्शनास आले आहे. ही वाढती रुग्णसंख्या पाहता, पािलका आराेग्य विभाग पुन्हा सज्ज झाले असून रुग्णसंख्या वाढल्यास पालिकेच्या प्रमुख रुग्णालयांची काेविड रुग्णांच्या आजारांप्रमाणे वर्गवारी करण्यात आली आहे व या वर्गवारीप्रमाणेच रुग्णांना उपचारासाठी दाख‌ल केले जाणार आहे.

  मुंबईत सष्टेंबर-ऑक्टाेबर महिन्यात काेराेना रुग्णवाढीचा वेग जास्त हाेता. त्यापेक्षा जास्त संख्येने अाता मुंबई शहर व उपनगरातील काही भागांमध्ये रुग्णवाढ हाेत असल्याचे समाेर येत आहे.

  नागरिक काेराेना नियमांचे पालन करत नसल्याने ही रुग्णवाढ दिवसेंदिवस हाेत असल्याचे आराेग्य विभागाचे म्हणणे आहे. त्यामुळे काेराेनासाठी पुन्हा बेड सज्ज ठेवण्याचे आदेश पालिका आराेग्य विभागाकडून देण्यात आले आहेत. पण यावेळी पालिका आराेग्य विभागाने काेविड रुग्णांची वर्गवारी केली असून या वर्गवारी प्रमाणेच पालिकेच्या तीन प्रमुख रुग्णालयात रुग्ण दाखल हाेणार असल्याचे वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

  यामुळे रुग्णालयीन कामकाजात सुसुत्रता येईल शिवाय रुग्णांसह रुग्णांच्या नातेवाईकांची ससेहाेलपट हाेणार नाही, ज्यामुळे रुग्णाांना त्वरीत उपचार मिळणे लवकरात लवकर शक्य हाेईल. येत्या काही दिवसांपासून प्रमुख रुग्णालयांची वर्गवारी हाेण्याची शक्यता वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

  रुग्णालयांची कोविड रुग्णांप्रमाणे वर्गवारी

  नायर : कोविड गराेदर महिला व नवजात बालक
  सायन : काेविड सर्जिकल व अतिगंभीर रुग्ण
  केईएम : काेविड जनरल रुग्ण
  कुपर : इतर आजाराचे रुग्ण

  ‘काेविड रुग्णसंख्या शहरात वाढत असल्याचे मागील काही दिवसांपासून निदर्शनास येत आहे. काेविड रुग्णांना त्वरीत उपचार मिळावे व रुग्णांचे हाल हाेवू नये यासाठी प्रमुख रुग्णालयांमध्ये वर्गवारी करण्यात आली आहे. यामुळे रुग्णांची ससेहाेलपट हाेणार नाही. येत्या काही दिवसात हा ॲक्शन प्लॅन सुरु हाेईल.

  - डाॅ. रमेश भारमल (संचालक, पालिका प्रमुख रुग्णालये व नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता)