waterlogging in nair hospital

तसेच कोविड चाचणी होत असलेल्या वॉर्ड मधे देखील पाणी शिरले आहे, ज्यामुळे चाचणी साठी येणाऱ्या रुग्णांना अडचणीचा सामना करावा लागत आहे, याबाबत प्रशासन मात्र दुर्लक्ष करत असल्याचे कर्मचाऱ्याकडून सांगण्यात येत आहे.

मुंबई : काल रात्रीपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईतील बहुतांश भाग जलमय झाला आहे. अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साठल्याने  (Waterlogged) मुंबईतील जनजीवन विस्कळीत झाले आहे.

तर दुसरीकडे, मुंबई सेंट्रल येथील पालिकेचे प्रमुख रुग्णालयांपैकी नायर रुग्णालय (Municipal Nair Hospital) देखील जलमय झाले आहे, रुग्णालय इमारतीचा बहुतांशी भाग हा सखल असल्याने इमारतीचा चारही बाजुचा परिसर जलमय (Waterlogged) झाला आहे. ज्यामुळे सकाळ पासुन उपचाराकरिता येत असलेल्या रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकाना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.


तसेच कोविड चाचणी (Corona Patients)  होत असलेल्या वॉर्ड मधे देखील पाणी शिरले आहे, ज्यामुळे चाचणी साठी येणाऱ्या रुग्णांना अडचणीचा सामना करावा लागत आहे, याबाबत प्रशासन मात्र दुर्लक्ष करत असल्याचे कर्मचाऱ्याकडून सांगण्यात येत आहे. रुग्णालय परिसरात शिरलेले पाणी बाहेर काढन्यासाठी प्रयत्न केले जात असले तरी ही यंत्राणा तोकडी पडत असल्याचे बोलले जात आहे.