शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दोन दिवसात शाळेत उपस्थित राहण्याचे पालिकेचे आदेश

मुंबई : शाळेचा उपस्थिती अहवाल तातडीने सादर करण्यासाठी पालिकेच्या शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी दोन दिवसांत शाळेत हजेरी लावावी असे आदेश पालिकेच्या शिक्षण विभागाने काढले आहेत.

  मुंबई :  शाळेचा उपस्थिती अहवाल तातडीने सादर करण्यासाठी पालिकेच्या शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी दोन दिवसांत शाळेत हजेरी लावावी असे आदेश पालिकेच्या शिक्षण विभागाने काढले आहेत. 

पालिकेच्या सर्व माध्यमाच्या शाळांच्या मुख्याध्यापकांसोबत सोमवारी शिक्षणाधिकारी महेश पालकर यांनी झूम अप द्वारे बैठक घेतली. यामध्ये त्यांनी शाळेचा उपस्थिती अहवाल तातडीने जाहीर करण्याचे आदेश दिले. हा अहवाल सादर करण्यासाठी गावी गेलेले शिक्षक, शिक्षणसेवक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी दोन दिवसांत शाळेत १०० टक्के उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत.
 शाळेत उपस्थित न झाल्यास महापालिका नियमानुसार संबंधित कर्मचाऱ्यांवर कार्यवाही करण्यात येईल, असे स्पष्ट निर्देश शिक्षणाधिकाऱ्यानी दिले आहेत. 
 
दरम्यान जिल्हाबंदी असल्याने तसेच वाहतुकीची व्यवस्था नसल्याने शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी शाळांमध्ये कसे उपस्थित राहावे? रेडझोन असल्याने शिक्षक-शिक्षकेतरांच्या आरोग्याचे काय ? त्यात अनेक शिक्षक मूळ गावी गेल्याने ते दोन दिवसात कसे उपस्थित राहतील याचा मुंबई महानगर पालिकेच्या प्रशासनाने विचार करावा व कारवाई करण्याचे पत्र मागे घ्यावे, अशी मागणी भाजपा शिक्षक आघाडीचे मुंबई-कोकण विभागाचे संयोजक अनिल बोरनारे यांनी केली आहे.