लसीकरणाच्या ट्रायलसाठी पालिका शाेधतेय मुले, अल्पवयीन मुलांच्या लसीकरणाबाबत पालकांच्या मनात संभ्रम

त्या काही महिन्यात संभाव्य काेराेनाची तिसरी लाट येण्याची शक्यता तज्ज्ञ डाॅक्टरांनी व्यक्त केली आहे. या लाटेत अल्पवयीन मुले संक्रमित हाेण्याची अटकळ व्यक्त करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर पालिका अरोग्य विभाग अल्पवयीन मुलांच्या सुरक्षेसाठी विशेष लसीकरण माेहिम सुरु करण्यात येणार आहे. यासाठी पालिका १२ ते १८ वर्षापर्यंतच्या मुलांच्या लसीकरणाच्या कार्यवाहीचा वेग व जनजागृती करण्यास सुरुवात केली आहे. पण तरीही, अल्पवयीन मुलांच्या ट्रायलसाठी पालिका अराेग्य विभागाला पालक व मुलांचा अल्प प्रतिसाद मिळत असल्याची खंत वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

    मुंबई : येत्या काही महिन्यात संभाव्य काेराेनाची तिसरी लाट येण्याची शक्यता तज्ज्ञ डाॅक्टरांनी व्यक्त केली आहे. या लाटेत अल्पवयीन मुले संक्रमित हाेण्याची अटकळ व्यक्त करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर पालिका अरोग्य विभाग अल्पवयीन मुलांच्या सुरक्षेसाठी विशेष लसीकरण माेहिम सुरु करण्यात येणार आहे. यासाठी पालिका १२ ते १८ वर्षापर्यंतच्या मुलांच्या लसीकरणाच्या कार्यवाहीचा वेग व जनजागृती करण्यास सुरुवात केली आहे. पण तरीही, अल्पवयीन मुलांच्या ट्रायलसाठी पालिका अराेग्य विभागाला पालक व मुलांचा अल्प प्रतिसाद मिळत असल्याची खंत वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. मागील आठवड्याभरात केवळ नायर रुग्णालयात पाच मुलांची लसीकरणाच्या ट्रायलसाठी नाव नाेंदणी झाली आहे. यामुळे ट्रायल कसे करायचे? असा प्रश्न अधिकाऱ्यांसमाेर उभा आहे.

    दरम्यान पालिकेच्या प्रमुख रुग्णालयांपैकी नायर रुग्णालयात जायडस कैडीला कंपनीचे ‘जाय कोविड’ काेराेना वैक्सीनचे ट्रायल सुरु करण्याचा पालिका अराेग्य विभागाचे जाेरदार प्रयत्न सुरु आहेत. हे ट्रायल १२ ते १८ वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी केले जाणार आहे. वैक्सीन ट्रायल ५० मुलांवर केले जाणार आहे. या ट्रायलसाठी नायर रुग्णालयात अल्पवयीन मुलांची नाेंदणीही सध्या सुरु आहे. मागील आठवड्याभरापासून सुरु असलेल्या ट्रायल नाेंदणीसाठी आतापर्यंत केवळ ५ मुलांची नाेंदणी झाली आहे. पालक व मुले यांचा अल्प प्रतिसाद मिळत असल्याने ट्रायलसाठी मुले कुठून आणणार ? असा प्रश्न वैद्यकीय अधिकाऱ्यांना पडला आहे. वैक्सीनबाबत अजूनही अनेक नागरिकांमध्ये संभ्रम असल्याने मुलांच्या वैक्सीनसाठी पालक पुढे येत नसल्याचेही दिसुन येत आहे.

    ट्रायलसाठी पालिका प्रशासन जनजागृतीवर भर देणार!

    नायर रुग्णालयात सुरु असलेल्या अल्पवयीन मुलांच्या ट्रायलसाठी मागील आठवड्यापासून आतापर्यंत केवळ ५ मुलांची नाेंदणी झाली आहे.मुंबईत ६ ते १२ वर्ष वयाेमानाच्या मुलांची संख्या साधारण २५ लाखांच्या घरात अाहे. यासाठी सुरक्षेच्या दृष्टिने सर्व मुलांचे लसीकरण हाेणे गरजेचे आहे. यासाठी पालिका अरोग्य विभागाची पूर्णपणे तयारी सुरु आहे. परंतु यासाठी वैक्सीनचे ट्रायल सुरु हाेणे महत्वाचे आहे. यासाठी आम्ही पालकांना विनंती करताे की, काेणतीही शंका मनात न ठेवता पुढे येवून ट्रायलमध्ये मुलांच्या नावाची नाेंदणी करावी. अशी प्रतिक्रीया नायर रुग्णालयाचे पालिका प्रमुख रुग्णालय व अधिष्ठाता डाॅ. रमेश भारमल यांनी दिली.