चेंबूरमध्ये तिघांवर १२ जणांनी केला हल्ला – एकाची हत्या तर दोन जण जखमी

चेंबूर:मुंबईत कोरोना विषाणूचा प्रसार मोठ्या प्रमाणात पसरला असून चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. यातच लॉकडाऊन आहे. त्यातच आता मुंबईच्या चेंबूर वाशी नाका परिसरात असलेल्या भारत

 चेंबूर:मुंबईत कोरोना विषाणूचा  प्रसार मोठ्या प्रमाणात पसरला  असून चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. यातच लॉकडाऊन आहे. त्यातच आता मुंबईच्या चेंबूर वाशी नाका परिसरात असलेल्या भारत नगरमध्ये एका कुटुंबातील तीन जणांवर हत्याराने १२ जणांनी हल्ला करून एकाची हत्या तर दोन जणांना जखमी केले आहे. पाच दिवसांपूर्वी आशिष यादव आणि अजित गुप्ता या दोघांनी एका तरुणीला छेडले होते.या प्रकरणातून प्रशांत पानवलकर या तरुणाची त्यांच्याशी भांडणे झाली होती. या प्रकरणी आरसीएफ पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा आणि घातक हत्यारने हल्ला असे विरोधी गुन्हे दाखल केले होते. मात्र पोलिसांनी कोरोनामुळे या प्रकरणात जास्त लक्ष दिले नाही. मात्र या प्रकरणाचा राग मनात ठेवून आशिष यादव, अजित गुप्ता यांनी त्यांच्या दहा साथीदारांना घेऊन काल संध्याकाळी न्यू भारत नगर येथे पीठ घेण्यास आलेल्या प्रशांत पानवलकर याच्यावर तलवारीने आणि इतर शस्त्रांनी हल्ला केला.त्याला वाचविण्यासाठी आलेले त्याचे भाऊ प्रल्हाद आणि प्रवीण यांना देखील त्यांनी जखमी केले.भर रस्त्यात हा हल्ला करण्यात आला.यात प्रशांतचा मृत्यू झाला. या प्रकरणी सात जणांना आरसीएफ पोलिसांनी अटक केली असून पाच जणांचा शोध सुरू आहे.