kisan morcha

शेतकऱ्यांच्या न्याय व हक्कासाठी १६ जानेवारी २०२१ रोजी मुस्लिम बांधव(muslim community) किसान आघाडी मोर्चासाठी मुंबईच्या आझाद मैदानावर एकत्र येणार आहेत.

मुंबई: शेतकऱ्यांच्या न्याय व हक्कासाठी १६ जानेवारी २०२१ रोजी मुस्लिम बांधव(muslim community) किसान आघाडी मोर्चासाठी मुंबईच्या आझाद मैदानावर एकत्र येणार आहेत.यात मीरा रोड, भिवंडी, चीता कॅम्प व इतरत्र ठिकाणावरून मुस्लिम बांधव येणार असल्याची माहिती मिळाली आहे.

हा लढा फक्त धान्य पिकविणाऱ्या शेतकऱ्यांचा नाहीतर हा लढा धान्य खाणार्‍या प्रत्येक नागरिकाचा आहे. हा मोर्चा जिंकण्यासाठी मुस्लिम बांधवांनी मुंबईच्या मदनपुरा भागात बैठक घेतली.या बैठकीत आमदार रहिस शेख व जनाब शाकीर शेख, जनाब मौलाना हकीम महमूद अहमद खान व सर्व मुस्लिम बांधव उपस्थित होते.