राज्यात ‘बर्ड फ्लू’चं संकट गहिरं, नागरिकांनी ही काळजी घेणं गरजेचं…

महाराष्ट्रात कोरोनापाठोपाठ ‘बर्ड फ्लू’चं संकट गहिरं होताना दिसत आहे. परभणी जिल्ह्यात नुकताच ८०० कोंबड्यांचा ‘बर्ड फ्लू’मुळे मृत्यू झालाय. प्रयोगशाळेने दिलेल्या अहवालातून ही बाब स्पष्ट झाली आहे. या पार्श्‍वभूमीवर राज्याचे पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी राज्यातल्या जनतेला सुरक्षेच्या दृष्टीने काही महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत.

महाराष्ट्रात ‘बर्ड फ्लू’नं शिरकाव केल्याचं महाराष्ट्र राज्य सरकारने जाहीर केले आहे. याबाबत काही नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले असून त्यातून या आजारानं महाराष्ट्रात शिरकाव केल्याचे स्पष्ट झालंय. विशेषतः महाराष्ट्रामध्ये कोंबड्या, बदक आणि पोपट यांचे मोठ्या प्रमाणात मृत्यू होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये या प्राण्यांचे मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या परिस्थितीला हाताळण्यासाठी सरकार सज्ज असून योग्य ते उपाय तातडीने केले जातील, असेही सरकारच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. देशभरातील अनेक राज्यांमध्ये सध्या ‘बर्ड फ्लू’नं शिरकाव करायला सुरुवात केली आहे. ‘बर्ड फ्लू’चा शिरकाव झालेलं महाराष्ट्र हे देशातलं आठवण राज्य ठरलं आहे.

महाराष्ट्रात कोरोनापाठोपाठ ‘बर्ड फ्लू’चं संकट गहिरं होताना दिसत आहे. परभणी जिल्ह्यात नुकताच ८०० कोंबड्यांचा ‘बर्ड फ्लू’मुळे मृत्यू झालाय. प्रयोगशाळेने दिलेल्या अहवालातून ही बाब स्पष्ट झाली आहे. या पार्श्‍वभूमीवर राज्याचे पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी राज्यातल्या जनतेला सुरक्षेच्या दृष्टीने काही महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत.

अंडी किंवा कोंबडी शिजवताना विशिष्ट तापमानात अर्ध्या तासापेक्षा जास्त काळ अन्न शिजवणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले. अर्ध्या तासापेक्षा जास्त आणि ७० अंशांपेक्षा जास्त तापमानात जर पदार्थ शिजवला तर त्यातील जिवाणू मरून जातो, हे स्पष्ट झालंय. मांसाहारींनी ही काळजी घेतल्यास ‘बर्ड फ्लू’ पासून असणारा धोका कमी होणार आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे संध्याकाळी याबाबत बैठक घेणार असून त्यात राज्यातील ‘बर्ड फ्लू’च्या परिस्थितीचा आढावा घेतला जाणार आहे.