अँटिलिया कार प्रकरणाचे गूढ उकलले, या प्रकरणी वापरण्यात आलेली इनोव्हा कार मुंबई पोलिसांची असल्याचे स्पष्ट

ही इनोव्हा कार मुंबईच्या गुन्हे शाखेची असल्याबाबतचे वृत्त आहे. चोरी झालेली स्कॉर्पियो कारचा मालक तर मनसुख हिरेन होता, पण प्रश्न असा आहे की, मग इनोव्हा कार कोणाची? याबाबत चौकशी सुरू होती. तर तपासणीत ही कार गुन्हे शाखेची असल्याचे निष्पन्न झाले आहे.

  मुंबई : एकीकडे पोलीस (Police) आणि सुरक्षा एजन्सीज, अँटिलिया (Antilia) कार प्रकरणाची गुंतागुंत सुटली असल्याचा दावा करत आहेत. तर आता प्रसारमाध्यमांना उपलब्ध झालेल्या अहवालानुसार मुकेश अंबानी यांच्या अँटिलियाच्या घराबाहेर ज्या दोन कार पोहोचल्या होत्या त्यापैकी एक होती स्कॉर्पियो (Scorpio) आणि दुसरी इनोव्हा (Innova) यापैकी चालक स्कॉर्पियो त्या ठिकाणी सोडून इनोव्हा गाडीत बसून घटनास्थळावरून फरार झाला होता. यानंतर मुंबईच्या मुलुंड टोलनाक्यावर या इनोव्हामध्ये दोन लोकं असल्याचे पाहण्यात आले होते.

  इनोव्हा कार मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा (CIU) शाखेची :

  ही इनोव्हा कार मुंबईच्या गुन्हे शाखेची असल्याबाबतचे वृत्त आहे. चोरी झालेली स्कॉर्पियो कारचा मालक तर मनसुख हिरेन होता, पण प्रश्न असा आहे की, मग इनोव्हा कार कोणाची? याबाबत चौकशी सुरू होती. तर तपासणीत ही कार गुन्हे शाखेची असल्याचे निष्पन्न झाले आहे. काही प्रसारमाध्यमांनी दिलेल्या अहवालानुसार ही इनोव्हा कार मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेची (CIU) आहे.

  पोलीस अधिकारी सचिन वाझे विशेष शाखेत बदली होण्याआधी गुन्हे शाखेत कार्यरत होते ही बाब लक्षात घ्यावी लागेल. तर सुरुवातीला गुन्हे शाखाच या प्रकरणाचा तपास करत होती. तर सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अँटिलिया कार प्रकरणी ज्या दोन कार्सचा वापर करण्यात आला होता त्यापैकी एक स्कॉर्पिओ होती ज्यात जिलेटिनच्या कांड्या ठेवण्यात आल्या होत्या. तर दुसरी कार इनोव्हा होती जी स्कॉर्पिओच्या पाठोपाठ चालत होती. मुंबईच्या मुलुंड टोलनाक्यावर ही इनोव्हा पाहण्यात आली होती. यानंतर मुंबईच्या चेंबूर परिसरात या दोन्ही इनोव्हा आणि स्कॉर्पिओ कार सोबतच आढळल्या होत्या त्यानंतर या दोन्ही गाड्या अँटिलियाच्या दिशेने कारमायकल रोडच्या दिशेने सोबतच जाताना दिसल्या.

  अशी घडली घटना :

  २५ फेब्रुवारी रोजी मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली एक स्कॉर्पिओ आढळली होती. स्कॉर्पिओमध्ये २० जिलेटीनच्या कांड्या आणि धमकीचं पत्र सापडलं होतं. तपासात असं आढळून आलं की, ही काक मनसुख हिरेन नावाच्या व्यवसायिकाची आहे. पण दुसऱ्याच दिवशी त्याचा मृतदेह ठाणे खाडीतल्या एका नाल्यात आढळून आला. पोलिसांना त्यांच्या तोंडात कोंबलेले पाच रुमाल आढळून आले. तर पोलिसांनी ही कार चोरीची असल्याचे सांगितले होते. १८-१९ फोब्रुवारीला ऐरोली-मुलुंड पुलावरून या चारची चोरी झाली होती.