नागपुरातील संचारबंदी ३१ मार्चपर्यंत कायम; पालकमंत्री डाॅ. नितीन राऊत यांची माहिती

नागपूरमध्ये लावलेले (Nagpur Lockdown) कडक निर्बंध हे ३१ मार्चपर्यंत लागू करण्यात आले आहेत. पालकमंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांनी तशी माहिती दिली आहे. आधी हे निर्बंध १५ ते २१ मार्चपुरता लावण्यात आले होते.

  • सर्वसामान्यांचे पुन्हा बेहाल; व्यवसाय कसा करावा, मोठा प्रश्न?

मुंबई (Mumbai). नागपूरमध्ये लावलेले (Nagpur Lockdown) कडक निर्बंध हे ३१ मार्चपर्यंत लागू करण्यात आले आहेत. पालकमंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांनी तशी माहिती दिली आहे. आधी हे निर्बंध १५ ते २१ मार्चपुरता लावण्यात आले होते. मात्र नागपुरातील सातत्याने वाढणारी रुग्णसंख्या लक्षात घेता, हे निर्बंध आता ३१ मार्चपर्यंत वाढवण्यात आले आहेत.

आज नागपुरातील सर्व लोकप्रतिनिधींसोबत बैठक घेण्यात आली होती, त्यानंतर पालकमंत्री नितीन राऊत यांनी ३१ मार्चपर्यंतच्या निर्बंधाबाबत निर्णय घेतल्याचं जाहीर केलं. मात्र निर्बंधांमुळे अर्थचक्राला कोणतीही बाधा येणार नाही, अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.

नागपूरमध्ये काय सुरू, काय बंद?

1. जिवनावश्यक वस्तूंची दुकाने दुपारी ४ पर्यंत खुली

२. भाजीपला दुपारी ४ वाजेपर्यंत मिळणार

३. हॉटेल, रेस्टॉरंट संध्याकाळी ७ पर्यंत खुले राहणार, ऑनलाईन पद्धतीने रात्री ११ पर्यंत डिलिव्हरीसाठी मुभा

४. परीक्षा कोविड नियमांअतर्गत होतील.