bmc

मुंबई पालिकेकडून(BMC) मिठी नदी आणि छोट्या नाल्यांमधील सफाई(Nala Cleaning) अजूनही ५० ते ६५ टक्क्यांपर्यंत झाली नाही. पालिकेने नालेसफाईची जाहीर केलेली आकडेवारी ही निव्वळ धूळफेक असल्याची टीका सामान्य मुंबईकरांसह(Mumbai) विरोधी पक्षांकडून केली जात आहे.

  मुंबई:पावसाळा अगदी तोंडावर येऊन ठेपला असतानाही मुंबई पालिकेकडून(BMC) मिठी नदी आणि छोट्या नाल्यांमधील सफाई(Nala Cleaning) अजूनही ५० ते ६५ टक्क्यांपर्यंत झाली नाही. पालिकेने नालेसफाईची जाहीर केलेली आकडेवारी ही निव्वळ धूळफेक असल्याची टीका सामान्य मुंबईकरांसह(Mumbai) विरोधी पक्षांकडून केली जात आहे.

  गेल्या आठवड्यात ‘तौक्ते’ चक्रीवादळाने मुंबईत पडलेल्या पावसाने छोट्या नाल्यामधून काढलेला गाळ पुन्हा नाल्यात गेल्याचाही अंदाज बांधला जात आहे. त्यास्थितीत छोट्या नाल्यांची सफाई करताना ती टप्प्याटप्प्याने करावी, अशीही मागणी जोर धरत आहे.

  मुंबई पालिकेकडून पावसाळ्यापूर्वी नालेसफाईची कामे हाती घेतली जातात. त्यात मोठे नाले, छोटे नाले अशी वर्गवारी केली जाते. पालिकेने कोरोनाच्या परिस्थितीत उपलब्ध मनुष्यबळाच्या आधारे नालेसफाई हाती घेतली आहे. त्यात छोट्या नाल्यांची सफाई ५३ टक्के एवढी झाली आहे. तर मोठ्या शहरातील मोठ्या नाल्यातील सफाई ९० टक्क्यांवर गेली असताना छोट्या नाल्यांच्या सफाईकडे दुर्लक्ष केले जाऊ नये, अशी आग्रही मागणी केली जात आहे.

  गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही कोरोना कहर कायम असताना नालेसफाईविषयी नेमकी काय स्थिती निर्माण होते, त्याबाबत मुंबईकरांना चिंता लागलो आहे. त्यामुळेच छोट्या नाल्यातील सफाई ५३ टक्के होतानाच मिठी नदीलगतची सफाईदेखील ६५ टक्क्यांपर्यंत मर्यादित राहिली आहे. पावसापूर्वी संपूर्ण नालेसफाई होईल असा पालिकेचा दावा आहे. पण पालिकेने यापूर्वी केलेले दावे फोल ठरल्याचीही टीका वारंवार केली जात आहे.

  कागदी घोडे
  मुंबईत नालेसफाईचे आकडे हे केवळ कागदी घोडे नाचवण्याचा प्रकार असल्याची टीका पालिकेतील विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी केली आहे. नाल्यांची योग्यप्रकारे सफाई झालेली नसल्याचीही टीका केली आहे.

  पावसात मुंबईकरांचे हाल
  यंदाही पावसात मुंबईकरांचे हाल होतील, असा इशाराही समाजवादी पक्षाचे गटनेते रईस शेख यांनी दिला आहे. गेल्या आठवड्यात वादळाने निर्माण झालेल्या पावसाने ठिकठिकाणी पाणी साचले त्यातून किती नालेसफाई झाली हे कळून चुकल्याचे शेख यांनी नमूद केले आहे.

  टप्प्याटप्प्यात सफाईचा मार्ग
  छोट्या नाल्यांची सफाई करताना तिथेही मोठ्या नाल्यांच्या धर्तीवर टप्प्यात सफाई करण्याची सूचना भाजपचे नगरसेवक अभिजित सामंत यांनी केली आहे.