रस्त्यावर नमाज पढणाऱ्या १०० हून अधिक लोकांच्या विरोधात गुन्हा दाखल

मुंबई: मुंबईतील डोंगरी भागात लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन करत गेल्या आठवड्यात रस्त्यावर नमाज पढणाऱ्या १०० पेक्षा जास्त नागरिकांविरोधात गुन्ह्याची नोंद झाली आहे. डोंगरी पोलीस स्थानकातील पोलीस

मुंबई: मुंबईतील डोंगरी भागात लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन करत गेल्या आठवड्यात रस्त्यावर नमाज पढणाऱ्या १०० पेक्षा जास्त नागरिकांविरोधात गुन्ह्याची नोंद झाली आहे. डोंगरी पोलीस स्थानकातील पोलीस अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली आहे. ही घटना बुधवारी रात्री एसवीपी रोडवर घडली होती. बुधवारी रजा अकादमी या संघटनेशी संबंधित ७२ वर्षाच्या एका स्थानिक नागरिकाचा मृत्यू झाला. त्या संघटनेच्या लोकांनी नमाज कार्यक्रमाचे आयोजन केले होते.या कार्यक्रमात उपस्थित असलेल्या १०० ते १२० लोकांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेले नाही.