नमस्कार मी राज बोलतोय , तब्येत ठीक आहे ना?.. मनसे प्रमुख राज ठाकरेंचा त्यांच्या माजी शिक्षिका सुमन रणदिवेंना फोन

सुमन लक्ष्मीकांत रणदिवे (८८) या दादरच्या बालमोहन विद्या मंदिरात गणित आणि विज्ञान विषयाच्या शिक्षका होत्या. १९९१ साली त्या निवृत्त झाल्या. वर्षभरापासून त्या वसईतील न्यू लाईफ फाउंडेशनच्या वृद्धाश्रमात राहत आहेत. तौक्ते चक्रीवादळामुळे वृद्धाश्रमाची वास्तू मोडकळीस आली आहे आणि वृद्धाश्रमाच्या अपुऱ्या सुविधांमुळे वृद्धांना त्रास सहन करावा लागत आहे.

    वसई : तौक्ते चक्रीवादळाचा जोरदार तडाखा पश्चिम किनारपट्टीला बसला आहे. समुद्र किनाऱ्याजवळ मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तौक्ते चक्रीवादळामुळे वसई येथील एका वृद्धाश्रमालाही त्यांचा फटका बसला आहे. न्यू लाईफ फाउंडेशनच्या पहिल्या मजल्यावरील खिडकीचा दरवाजा कोसळून एक वृद्ध नागरिकदेखील जखमी झाला. त्याचं वृद्धाश्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांना शालेय शिक्षण दिलेले शिक्षकही राहत आहेत.

    सुमन लक्ष्मीकांत रणदिवे (८८) या दादरच्या बालमोहन विद्या मंदिरात गणित आणि विज्ञान विषयाच्या शिक्षका होत्या. १९९१ साली त्या निवृत्त झाल्या. वर्षभरापासून त्या वसईतील न्यू लाईफ फाउंडेशनच्या वृद्धाश्रमात राहत आहेत. तौक्ते चक्रीवादळामुळे वृद्धाश्रमाची वास्तू मोडकळीस आली आहे आणि वृद्धाश्रमाच्या अपुऱ्या सुविधांमुळे वृद्धांना त्रास सहन करावा लागत आहे.

    महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी सुमन रणदिवे यांच्याशी फोनवरून संवाद साधला. राज ठाकरेंनी फोन करताच सुमन यांनी आपलं गाऱ्हाण मांडलं ” वादळामुळे खूप मोठं नुकसान झालंय , जास्तीत जास्त मदत कर.” अशी विनंती सुमन रणदिवे यांनी केली. सुमन रणदिवे यांनी मुख्यमंत्र्यांना भेटण्याची इच्छासुद्धा व्यक्त केली. त्यावर राज ठाकरे म्हणाले ” मी अविनाश जाधव यांना सांगितले आहे, ते नक्कीच मदत करतील. तुम्ही काळजी करू नका.” यावेळी रणदिवेनीं कुंदा कशी आहे? अशी विचारपूस केली. त्यावर आई बरी आहे असे राज ठाकरेंनी सांगितले. ” तु /मध्यंतरी इथे आला होतास, पण आपली भेट झाली नाही. एकदा मला भेटायला ये ना, असं म्हणत सुमन रणदिवेनीं राज ठाकरेंना भेटण्याची इच्छा व्यक्त केली. त्यावर राज ठाकरे म्हणाले, ” लॉकडाऊन संपू दे, नक्की भेटायला येतो,” असा शब्द दिला.