NIA च्या नावाखाली राज्याला बदनाम करण्याचं काम ; नाना पटोलेंची भाजपवर सडकून टीका

ज्या पद्धतीने महाराष्ट्र, मुंबई पोलिसाला भाजपच्यावतीने ज्या पद्धतीने खलनायक ठरवण्याचं कृत्य केलं जात आहे, भाजपच्या कृत्याला काँग्रेसचा विरोध आहे. मुंबई पोलिसांना केंद्राकडून बदनाम केलं जात आहे. NIA च्या नावाखआली राज्याला बदनाम करण्याचं काम भाजप करत आहे, असा आरोप नाना पटोले यांनी केला.

    मुंबई : मुंबई पोलीस दल अधिकारी सचिन वाझे यांच्या प्रकरणावर नाना पटोले यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. सचिन वाझे प्रकरणावर काँग्रेस नाराज नाही. वाझेंना पाठीशी घालण्याची काँग्रेसची भूमिका नाही. तसेच एनआयएच्या नावाखाली राज्याला बदनाम करण्याचं काम भाजप करत असल्याची टीका प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

    ज्या पद्धतीने महाराष्ट्र, मुंबई पोलिसाला भाजपच्यावतीने ज्या पद्धतीने खलनायक ठरवण्याचं कृत्य केलं जात आहे, भाजपच्या कृत्याला काँग्रेसचा विरोध आहे. मुंबई पोलिसांना केंद्राकडून बदनाम केलं जात आहे. NIA च्या नावाखआली राज्याला बदनाम करण्याचं काम भाजप करत आहे, असा आरोप नाना पटोले यांनी केला. यावेळी त्यांनी वाझेंच्या आडून प्रकरण दाबलं जात असल्याचं देखील म्हटलं. पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांबद्दल बोलताना हा अधिकार मुख्यमंत्र्यांचा आहे. तसंच ते खातं आमच्याकडे नसल्यामुळे आम्ही बोलत नाही, असं नाना पटोले म्हणाले.

    सचिन वाझे यांना अडचणीत आणणारी आणखी एक गोष्ट समोर आली आहे. सचिन वाझे यांचं घर असलेल्या ठाण्यातील साकेत सोसायटीमधील दोन डीव्हीआर मनसुख हिरेन यांचा मृत्यू होण्याच्या आधी जप्त करण्यात आल्याचं समोर आलं आहे. मनसुख हिरेन यांचा ५ मार्च रोजी मृतदेह मुंब्र्याच्या खाडीमध्ये सापडला. मात्र, साकेत सोसायटीमधले डीव्हीआर २७ फेब्रुवारीला जप्त करण्यात आले आहेत. याबाबतचे पत्रव्यवहार समोर आल्याची माहिती मिळाली आहे.