मुख्य सचिवांच्या अहवालामुळे फडणवीसांचा खोटारडेपणा पुन्हा उघड, नाना पटोलेंचे मत

मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्या अहवालाने(kunte report) फडणवीसांचा दावा धादांत खोटा निघाला असून शुक्ला यांनी फोन टॅपिंगची परवानगी दहशतवादी कारवायांचे संदेश टिपण्यासाठी घेतली. मात्र त्याचा गैरवापर करुन राजकीय नेते व काही अधिकाऱ्यांचे फोन बेकायदेशीपणे टॅप केल्याचे कुंटे(kunte) यांच्या अहवालानुसार स्पष्ट झाले आहे. फडणवीस (fadanvis)यांचा खोटारडेपणा पुन्हा उघड झाला आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले(nana patole) यांनी म्हटले आहे.

    मुंबई : राज्यातील पोलीस बदल्यांसाठी(police transfer) मोठे रॅकेट चालते, असा अहवाल गुप्तचर विभागाच्या तत्कालीन आयुक्त रश्मी शुक्ला यांनी फोन टॅप करुन उघड केले होते, असा खोटा दावा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला होता.

    मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्या अहवालाने तो दावा धादांत खोटा निघाला असून शुक्ला यांनी फोन टॅपिंगची परवानगी दहशतवादी कारवायांचे संदेश टिपण्यासाठी घेतली. मात्र त्याचा गैरवापर करुन राजकीय नेते व काही अधिकाऱ्यांचे फोन बेकायदेशीपणे टॅप केल्याचे कुंटे यांच्या अहवालानुसार स्पष्ट झाले आहे. फडणवीस यांचा खोटारडेपणा पुन्हा उघड झाला आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.

    सर्व चित्र स्पष्ट
    कुंटे यांच्या अहवालामुळे सर्व चित्र स्पष्ट झाले असून शुक्ला यांनी अहवालासोबत कोणताही पेन ड्राईव्ह दिला नव्हता असे असताना फडणवीस यांनी खोटी माहिती देऊन संशय वाढवला व महाराष्ट्राची बदनामी केली. हे कृत्य अत्यंत बेजाबदारपणाचे आहे. अधिकाऱ्यांनी कोणत्याही पक्षासाठी काम करु नये तर जनतेसाठी काम करावे असे आवाहनही पटोले यांनी केले.