नाना पटोले यांचाही फोन टॅप झाला होता, काँग्रेस नेत्याचे गंभीर आरोप

थोरात म्हणाले की, नाना पटोले यांचा फोन 2017-18 मध्ये टॅप झाला होता. आता जे प्रकरण देशपातळीवर समोर येतंय ते गंभीर आहे. यामुळे आपल्या देशातील महत्त्वाच्या व्यक्तींची माहिती शत्रू देशांकडेही जाऊ शकते, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे.

    मुंबई: सध्या देशात पेगासस(pegasus) सॉफ्टवेअरची चर्चा सुरू आहे. पेगाससद्वारे भारतातील प्रतिष्ठीत व्यक्तींचे फोन हॅक केल्याचा दावा करण्यात येतोय. या मुद्द्यावरुन काँग्रेससह विरोधकांनी संसदेच्या पावसाळी अधिवेशनात (Parliament Monsoon Session) सरकारला धारेवर धरलं आहे. दरम्यान, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांचाही फोन टॅप (Phone Tap) झाल्याचा दावा राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केला आहे.

    थोरात म्हणाले की, नाना पटोले यांचा फोन 2017-18 मध्ये टॅप झाला होता. आता जे प्रकरण देशपातळीवर समोर येतंय ते गंभीर आहे. यामुळे आपल्या देशातील महत्त्वाच्या व्यक्तींची माहिती शत्रू देशांकडेही जाऊ शकते, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे.

    दरम्यान, यावेळी थोरातांनी राज्यपाल नियुक्त आमदारांच्या नियुक्तीवरही भाष्य केले. राज्यपालांनी अद्याप निर्णय घेतलेला नाही. राज्यातील लोकांच्या मूलभूत हक्कावर गदा आहे. कारण महाराष्ट्रातील प्रश्न या 12 आमदारांमार्फत सभागृहात मांडले गेले असते, ते सोडवले गेले असते.