नानाजी काय तुमची अवस्था?”, म्हणत भाजप प्रवक्त्यांनी ट्विट करत काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची उडविली खिल्ली!

भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ट्विट करत नाना पटोले यांना टोला लगावला आहे. “नानाजी काय तुमची अवस्था? काँग्रेसमुळे जे सत्तेत आहेत, तेच प्रदेशाध्यक्षांविरोधात काम करीत आहेत.

    मुंबई : “नानाजी काय तुमची अवस्था?”, असे म्हणत भाजप प्रवक्ता केशव उपाध्ये यांनी ट्विट करत पटोले यांची खिल्ली उडविली आहे.  स्वबळाचा नारा देणाऱ्या प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या लोणावळ्यातील वक्तव्यांवर शरद पवार यांनी केलेल्या अनुल्लेखानंतर भाजप प्रवक्ता केशव उपाध्ये यांनी ट्विट करत पटोले यांच्यावर तिरकस शब्दात टिप्पणी केली आहे.

    काँग्रेसमुळे जे सत्तेत आहेत

    भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ट्विट करत नाना पटोले यांना टोला लगावला आहे. “नानाजी काय तुमची अवस्था? काँग्रेसमुळे जे सत्तेत आहेत, तेच प्रदेशाध्यक्षांविरोधात काम करीत आहेत. थेट प्रदेशाध्यक्षांवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, अजित पवार पाळत, फोन टॅप तरी काँग्रेस गप्प… ना सत्तेत काँग्रेसला कुणी विचारत, ना काँग्रेसमध्ये तुम्हाला असे चित्र आहे हे,” अशी उपाध्ये यांनी ‘टिप्पणी’ केली आहे.

    Nanaji what is your condition BJP spokesperson tweeted and mocked the Congress state president