अभिनेता नाना पाटेकर आपल्या इवल्याश्या मित्रासोबत क्षण घालविण्यात झाले रममान
अभिनेता नाना पाटेकर आपल्या इवल्याश्या मित्रासोबत क्षण घालविण्यात झाले रममान

मुंबई (Mumbai) :  तुमचा आमचा आवडता नाना अर्थात नाना पाटेकर सध्या चित्रपटांपासून दूर आहेत. पण सोशल मीडियावर मात्र चांगलेच अ‍ॅक्टिव्ह आहेत. चाहत्यांसाठी ते अनेक फोटो व व्हीडिओ शेअर करत असतात. अलीकडे नानांनी असाच एक फोटो शेअर केला आणि हा फोटो क्षणात व्हायरल झाला. एक चिमणी अलगद नानांच्या हातावर येऊन बसलेली या फोटोत दिसत आहे. 'मित्र... हा फोटो खूप सुंदर आहे,' असे हा फोटो शेअर करताना नानांनी लिहिले. नानांनी हा सुंदर फोटो शेअर केला आणि चाहतेही या सुंदर फोटोच्या प्रेमात पडले आहेत. चाहत्यांनी या फोटोंवर कमेंट्सचा अक्षरश: पाऊस पाडला.

मुंबई (Mumbai) :  तुमचा आमचा आवडता नाना अर्थात नाना पाटेकर सध्या चित्रपटांपासून दूर आहेत. पण सोशल मीडियावर मात्र चांगलेच अ‍ॅक्टिव्ह आहेत. चाहत्यांसाठी ते अनेक फोटो व व्हीडिओ शेअर करत असतात. अलीकडे नानांनी असाच एक फोटो शेअर केला आणि हा फोटो क्षणात व्हायरल झाला. एक चिमणी अलगद नानांच्या हातावर येऊन बसलेली या फोटोत दिसत आहे. ‘मित्र… हा फोटो खूप सुंदर आहे,’ असे हा फोटो शेअर करताना नानांनी लिहिले. नानांनी हा सुंदर फोटो शेअर केला आणि चाहतेही या सुंदर फोटोच्या प्रेमात पडले आहेत. चाहत्यांनी या फोटोंवर कमेंट्सचा अक्षरश: पाऊस पाडला.

‘सच्च्या माणसालाच असे मित्र भेटतात,’ असे एका चाहत्याने यावर कमेंट करताना लिहिले. तर अन्य एका चाहत्याने, बॉलिवूडचा सर्वांत प्रामाणिक आणि सच्चा अभिनेता, असे लिहित नानांचे कौतुक केले. अलिकडे नाना पाटेकर यांनी सुशांत सिंग राजपूतच्या कुटुंबीयांची भेट घेतली. त्यांनी सुशांतच्या पाटण्यातील घरी जाऊन त्याच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले होते. सुशांतच्या फोटोला पुष्पहार अर्पण करून नानांनी श्रद्धांजली वाहिली होती. यानंतर त्याच्या कुटुंबीयांची विचारपूस केली.

जवळपास अर्धा तास नाना पाटेकर सुशांतच्या कुटुंबीयांसोबत होते. नाना पाटेकर यांनी मराठी, बॉलिवूड चित्रपटसृष्टीत आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या अग्निसाक्षी, क्रांतीवीर या चित्रपटांना प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर घेतले. त्यांना आजवरच्या अनेक भूमिकांसाठी पुरस्कार मिळाले असून त्यांच्या अभिनयाचे अनेक फॅन्स आहेत.