एकनाथ शिंदे शिवसेनेला कंटाळलेत, पक्षात प्रवेश करण्यासाठी फोन करणार ; नारायण राणेंचा मोठा गौप्यस्फोट

वसईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना, नारायण राणे यांनी शिवसेना आणि महाविकास आघाडीवर निशाणा साधला होता. एकनाथ शिंदे मातोश्रीच्या आदेशाशिवाय एकही सही करु शकत नाहीत. ते केवळ सही पुरतेच मंत्री असून, शिवसेनेला कंटाळले आहेत. त्यांना लवकर आमच्यात घेऊ. मी त्यांना फोन करणार आहे, ते आले तर स्वागतच, असा गौप्यस्फोट करत, मनात आणले तर ठाकरे सरकारचं विसर्जन करु, असा दावा राणेंनी केला आहे. 

    केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी जन आशीर्वाद यात्रेच्या दरम्यान महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला आहे. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत नारायण राणे यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. एकनाथ शिंदे मातोश्रीच्या आदेशाशिवाय एकही सही करु शकत नाहीत. ते केवळ सही पुरतेच मंत्री असून, शिवसेनेला कंटाळले आहेत. असं वक्तव्य नारायण राणे यांनी केल्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

    वसईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना, नारायण राणे यांनी शिवसेना आणि महाविकास आघाडीवर निशाणा साधला होता. एकनाथ शिंदे मातोश्रीच्या आदेशाशिवाय एकही सही करु शकत नाहीत. ते केवळ सही पुरतेच मंत्री असून, शिवसेनेला कंटाळले आहेत. त्यांना लवकर आमच्यात घेऊ. मी त्यांना फोन करणार आहे, ते आले तर स्वागतच, असा गौप्यस्फोट करत, मनात आणले तर ठाकरे सरकारचं विसर्जन करु, असा दावा राणेंनी केला आहे.

    आमदार नीलम गोऱ्हे यांना मी शिवसेनेतं आणलं. त्यांच्या आमदारकीसाठी मी प्रयत्न केले. आता पहा त्यांची त्यांच्याच पक्षात किती फरफट होत आहे, असा टोला लगावला, तर राष्ट्रवादीवर केलेल्या राज ठाकरेंच्या विधानावर, राज ठाकरे जे बोलले ते अगदी बरोबर बोलले. मी त्यांचा मुद्दा खोडत नाही, असं सांगत, उद्या मनसे-भाजपची युती झाली तर आनंद आहे, असं विधान राणेंनी केलं आहे.