The two biggest enemies in politics together; Chief Minister Uddhav Thackeray-Narayan Rane will appear on one stage

सचिन वाझे प्रकरणातील आत्तापर्यंतच्या घडामोडींना मुख्यमंत्री जबाबदार आहेत. त्यामुळे नैतिक जबाबदारी स्वीकारुन मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी नारायण राणे(narayan rane demanded resignation of chief minister) यांनी केली आहे.

    सचिन वाझे(sachin waze) प्रकरणाच्या तपासातून रोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत. यावरुन काल संध्याकाळी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी चर्चा केली. तसेच आज मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची उचलबांगडी करण्यात आली. यावरुन भाजपचे नेते नारायण राणे यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.

    सचिन वाझे यांना निलंबित केलं असताना त्यांना पुन्हा पोलीस खात्यात घेणे क्राईममध्ये पोस्टिंग देणे, त्यांना प्रत्येक वेळी संरक्षण देणे, वाझे यांच्यावर कारवाई करण्यात विलंब लावणे, विरोधी पक्षाच्या दबावामुळे वाझे यांच्यावर कारवाई करणे, त्यातच मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची बदली होणे या सर्वांना मुख्यमंत्री जबाबदार आहेत. त्यामुळे नैतिक जबाबदारी स्वीकारुन मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी नारायण राणे यांनी केली आहे.

     पोलिसांवर राजकीय नेत्यांचा दबाव कशासाठी ?

    दरम्यान माजी मंत्री सुधीर मुगंटीवार यांनीही राज्य सरकारवर टीका केली आहे. पोलीसावर राजकीय नेत्यांचा दबाव नसावा, जेव्हा तुम्ही चांगले काम करण्यासाठी चांगलं वातावरण निर्माण करता तेव्हा पोलीस चांगल काम करु शकतात. अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याऐवजी आपण राजकीय नेते म्हणून आपल्यात बदल केला तर पोलीस व्यवस्था उत्तम काम करु शकेल, असा टोला भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी लगावला आहे.