Narayan Rane says about the ED inquiry of Sanjay Raut's wife

पुरावे असल्याशिवाय ईडी आणि सीबीआय चौकशी करत नाही. पुरावा लागतो. तेव्हाच ते नोटीस पाठवतात आणि तपास करतात अशा शब्दात नारायण राणे यांनी संजय राऊतांवर निशाणा साधला.

मुंबई : शिवसेना नेते संजय राऊत यांच्या पत्नीची ईडी चौकशी होणार आहे. यावरुन भाजप नेते नारायण राणे यांनी संजय राऊतांवर जोरदार निशाणा साधला आहे.

राऊत एवढी बडबड करतात, मग जाऊ देना ईडीच्या समोर असे म्हणत राणेंनी राऊतांवर टीकास्त्र सोडेल. तसेच संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने पाठविलेल्या नोटिशीचे राणेंनी समर्थन केले आहे.

पुरावे असल्याशिवाय ईडी आणि सीबीआय चौकशी करत नाही. पुरावा लागतो. तेव्हाच ते नोटीस पाठवतात आणि तपास करतात अशा शब्दात राणे यांनी राऊतांवर निशाणा साधला.

पीएमसी बँकेत गैरव्यवहार झाला आहे. एक कोटीला घेतलेली मालमत्ता नेमकी किती कोटींची आहे? आज त्याची किंमत अकरा ते बारा कोटी आहे. मग ती मालमत्ता एक कोटीला कशी काय मिळाली? आणि मग एक कोटीला कर्ज दाखवायचं, म्हणून ईडीला तक्रार गेली. त्या बँकेची चौकशी सुरू असताना हे पुरावे मिळाले, म्हणून ईडीने ही नोटीस पाठवली असल्याचेही नारायण राणे म्हणाले.