नारायण राणे-शिवसेना संघर्ष वाढणार; ‘कोंबडी चोर’ म्हणत शिवसेनेना आक्रमक

आता दादरमध्ये शिवसैनिकांकडून ‘कोंबडी चोर’ चे पोस्टर लावलेले पाहायला मिळाले आहेत. दादरमध्ये झालेल्या ‘कोंबडी चोर’ या पोस्टरबाजीनं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं. या पोस्टबाजीची चर्चा तुफान व्हायरल होऊ लागल्यानं तासाभरात पोलिसांनी हे पोस्टर काढून घेतलेले पाहायला मिळाले. मात्र पोस्टर जरी काढून घेतले असले तरी सध्या त्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मुख्यमंत्र्यावर केलेल्या वादग्रस्त टीकेमुळे नारायण राणेेंची मध्यरात्री दादरमध्ये पोस्टरबाजी केली.

    मुंबई : केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नारायण राणे यांनी नुकतंच रायगडमधील महाड येथे मुख्यमंत्र्यावर टीका केली होती. महाड येथे पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्र्यांवर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नारायण राणेंवर नाशिक येथे गुन्हा दाखल झाला आहे.

    दरम्यान यातच आता दादरमध्ये शिवसैनिकांकडून ‘कोंबडी चोर’ चे पोस्टर लावलेले पाहायला मिळाले आहेत. दादरमध्ये झालेल्या ‘कोंबडी चोर’ या पोस्टरबाजीनं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं. या पोस्टबाजीची चर्चा तुफान व्हायरल होऊ लागल्यानं तासाभरात पोलिसांनी हे पोस्टर काढून घेतलेले पाहायला मिळाले. मात्र पोस्टर जरी काढून घेतले असले तरी सध्या त्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मुख्यमंत्र्यावर केलेल्या वादग्रस्त टीकेमुळे नारायण राणेेंची मध्यरात्री दादरमध्ये पोस्टरबाजी केली. तेथील स्थानिक शिवसेना नगरसेवक अमेट घोले यांनी दादर टीटी परिसरात पोस्टरबाजी केली होती.

    नारायण राणेंच्या या टीकेमुळे शिवसैनिकांच्या भावना दुखावल्या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या नारायण राणेंचा मुद्दा चिघळत चाललेला पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता सगळ्या देशाचं लक्ष या घटनेकडे लागलेलं आहे. दरम्यान, नारायण राणे यांनी जनआशीर्वाद यात्रेवेळी महाड येथे पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर राणे यांनी जोरदार टीका केली. राणेंनी म्हटलं मी उद्धव ठाकरे यांच्या कानशिलात लगावली असती. यानंतर देशातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे.