मुंबईत नारायण राणेंची जन आशीर्वाद यात्रा, तब्बल ‘इतक्या’ ठिकाणी आयोजकांवर गुन्हे दाखल

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची जन आशीर्वाद यात्रा कालपासून सुरू झाली आहे. मात्र या जन आशीर्वाद यात्रेच्या आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोविडच्या पार्श्वभूमीवर गर्दी जमवायला परवानगी नसताना देखील भाजपनं जन आशीर्वाद यात्रा काढली. दरम्यान याचं पार्श्वभूमीवर मुंबईत 7 ठिकाणी आयोजकांवर गुन्हे दाखल झाले आहेत.

    मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची जन आशीर्वाद यात्रा कालपासून सुरू झाली आहे. मात्र या जन आशीर्वाद यात्रेच्या आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोविडच्या पार्श्वभूमीवर गर्दी जमवायला परवानगी नसताना देखील भाजपनं जन आशीर्वाद यात्रा काढली.

    दरम्यान याचं पार्श्वभूमीवर मुंबईत 7 ठिकाणी आयोजकांवर गुन्हे दाखल झाले आहेत. काल केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रेला मुंबईतून सुरुवात झाली. विलेपार्ले, खेरवाडी, माहीम, शिवाजी पार्क, दादर, चेंबूर, गोवंडी पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आलेत. जन आशीर्वाद यात्रेची परवानगी नसतानाही ती काढल्यानं पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

    तसेचं मंगळवारी संध्याकाळी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या स्वागतासाठी भाजपच्या नवी मुंबईतील पदाधिकाऱ्यांनी महापालिका मुख्यालयापासून जनआशीर्वाद यात्रा काढली होती. या यात्रेत कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याने एनआरआय पोलिसांनी आयोजकांसह 70 ते 80 भाजपच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केल्याचं समजतंय.

    जन आशीर्वाद यात्रेत नारायण राणे काय म्हणाले होते?

    केवळ बोलल्याने बेकारी जात नाही, त्यासाठी काम करावे लागते, असं म्हणत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेवर टीका केली आहे. मी 16-16 तास काम करतो, असं सांगतानाच राणेंनी उमेदीच्या काळातील राजकीय घटनांच्या आठवणी सांगितल्या.