आजपासून नारायण राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रेला सुरुवात, कशी असेल जन आशीर्वाद यात्रा? : जाणून घ्या सविस्तर

केंद्रीय सुक्ष्म लघू उद्योग मंत्री नारायण राणे 19 ॲागस्ट म्हनजे आज्पासून मुंबईतून या यात्रेची सुरूवात करणार आहेत. 560 किमीचा प्रवास हे मंत्री या यात्रेतून करणार असून, राज्यातील आगामी महापालिका निवडणुका लक्षात घेऊन ही यात्रा केली जात आहे.

  मुंबई : केंद्रीय सुक्ष्म लघू उद्योग मंत्री नारायण राणे 19 ॲागस्ट म्हनजे आज्पासून मुंबईतून या यात्रेची सुरूवात करणार आहेत. 560 किमीचा प्रवास हे मंत्री या यात्रेतून करणार असून, राज्यातील आगामी महापालिका निवडणुका लक्षात घेऊन ही यात्रा केली जात आहे. त्यात, राणे कोकण पूर्णपणे पिंजून काढणार आहेत. तसेंच कोकणातील बॅक लॉक भरून काढण्यासाठी आणि कोकणात भाजपाचे वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी या जन आशीर्वाद यात्रेचे आयोजन करण्यात आल्याचे बोलले जात आहे.

  अशी असेल नारायण राणेंची जन आशीर्वाद यात्रा

  • 19 आणि 20 ऑगस्ट असे दोन ही यात्रा मुंबईत असेल
  • 21 ऑगस्टला वसई- विरार
  • 23 ऑगस्टला दक्षिण रायगड
  • 24 ऑगस्टला चिपळूण
  • 25 ऑगस्टला रत्नागिरी
  • 26 ऑगस्टला सिंधुदुर्ग

  19 ते 26 असा या जन आशीर्वाद यात्रेचा कालावधी असणार आहे. मुंबईहून सुरु होणाऱ्या या यात्रेचा सिंधुदुर्ग येथे समारोप होईल.