The two biggest enemies in politics together; Chief Minister Uddhav Thackeray-Narayan Rane will appear on one stage

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्रात लिहिले आहे की, महाराष्ट्र सरकार योग्यरित्या काम करत नाही. सर्व काही अधिकाऱ्यांच्या इच्छेनुसार केले जाते, मुकेश अंबानी यांच्यासारख्या मोठ्या व्यक्ती मुंबईत असुरक्षित आहेत. तसेच, राज्यातील भ्रष्टाचार आणि कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती कमकुवत झाली आहे.

    मुंबई : पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना अटक करण्यात आली आहे. तसेच मुंबईचे पोलीस आयुक्त इकबाल सिंह चहल यांची पदावरून उचलबांगडी करण्यात आली आहे. तसेच या प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. दरम्यान, महाराष्ट्र सरकार योग्यरित्या काम करत नाही, मुकेश अंबानी यांच्यासारख्या मोठ्या व्यक्ती मुंबईत असुरक्षित आहेत. अशा प्रकारचं पत्र भाजपाचे राज्यसभा खासदार नारायण राणे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना लिहिलं आहे.

    यासंदर्भात त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्रात लिहिले आहे की, महाराष्ट्र सरकार योग्यरित्या काम करत नाही. सर्व काही अधिकाऱ्यांच्या इच्छेनुसार केले जाते, मुकेश अंबानी यांच्यासारख्या मोठ्या व्यक्ती मुंबईत असुरक्षित आहेत. तसेच, राज्यातील भ्रष्टाचार आणि कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती कमकुवत झाली आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचा राजीनामा आणि राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहिले आहे, असे नारायण राणे यांनी सांगितले.

    दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ गाडी सापडल्या प्रकरणी आणि गाडीचा मालक मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात मुंबई पोलीस दलातील पोलीस अधिकारी सचिन वाझेंना अटक झाल्याने त्याची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कठोर पावले उचलली आहेत.