Nashik woman molested in Mumbai; Accused arrested from Karnataka

अब्दुल गनी सय्यद बागवान (६५,रा. मार्शल गल्ली फुटपाथ, मुंबई) असे आरोपीचे नाव आहे. अब्दुल याने वरळी परिसरातील फुटपाथवर राहणाऱ्या एका मनोरुग्ण महिलेचा विनयभंग केला होता. २७ एप्रिल रोजी हा प्रकार घडला होता. या प्रकरणी वरळी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याचा तपास करताना अब्दुलने महिलेचा विनयभंग केल्याची माहिती तपासी पथकाला प्राप्त झाली.

    मुंबई: नाशिकमधील महिलेचा मुंबईत विनयभंग झाला. काहीच पुरावे नसताना वरळी पोलिसांनी आरोपीला शोधून काढले  आहे. कर्नाटकमधून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

    अब्दुल गनी सय्यद बागवान (६५,रा. मार्शल गल्ली फुटपाथ, मुंबई) असे आरोपीचे नाव आहे. अब्दुल याने वरळी परिसरातील फुटपाथवर राहणाऱ्या एका मनोरुग्ण महिलेचा विनयभंग केला होता. २७ एप्रिल रोजी हा प्रकार घडला होता. या प्रकरणी वरळी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याचा तपास करताना अब्दुलने महिलेचा विनयभंग केल्याची माहिती तपासी पथकाला प्राप्त झाली.

    मात्र, अब्दुल फुटपाथवर राहत असल्याने त्याचा नेमका ठावठिकाणा कोणालाच माहित नव्हता. तसेच त्याच्याकडे ना मोबाईल होता ना महिलेचा विनयभंग केला तेथे सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज नव्हते. त्यामुळे या गुन्ह्याचा तपास करणे वरळी पोलिसांसमोर आवाहन होते. तपासादरम्यान पोलिसांना अब्दुल कर्नाटकात असल्याचे खबऱ्याकडून समजले. त्यानुसार पोलीस उपायुक्त परमजीत सिंह दहिया, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल कोळी, पोलीस निरीक्षक (गुन्हे) धनंजय फडतरे यांच्या मार्गदर्शनखाली पोलीस उपनिरीक्षक विश्वास धुमाळ, पोलीस नाईक संदीप बुगडे, पोलीस नाईक अलंकार जाधव आदी पोलिसांचे पथक कर्नाटक राज्यात दाखल झाले.

    या पथकाने उक्केरी गावात सापळा रचून मशीद परिसरात राहत असलेल्या अब्दुल गनी सय्यद बागवान याला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याला मुंबईत आणल्यावर सोमवारी न्यायालयात हजर केले असता पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

    दरम्यान, कुठल्याही प्रकारचा पुरावा हाती नसताना उत्तमरीत्या तपास करून आरोपीला तुरुंगात धाडल्याने उपायुक्त परमजीत सिंह दहिया व वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल कोळी यांनी तपासी पथकाचे कौतुक केले.

    मनोरुग्ण महिलेची नाशिकमध्ये घरवापसी

    पीडित महिला मनोरुग्ण असून तिला उपचारासाठी नाशिकहून मुंबईत आणले होते. जे जे रुग्णालयात तिला दाखल करणयात आले होते. दरम्यानच्या काळात तिची नातेवाईकांसोबत ताटातूट झाली. अन् महिला वरळी परिसरातील फुटपाथवर राहू लागली. तिच्यावर अब्दुलची नजर पडली आणि त्याने तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. या घटनेची माहिती समजताच पोलिसांनी महिलेला ताब्यात घेतले. वेडसर असल्यामुळे तिला स्वत:चे नावदेखील सांगता येत नव्हते. अशा अवस्थेत तिच्या नातेवाईकांचा शोध घेणेही पोलिसांसमोर आवाहन होते. पोलिसांनी तात्काळ शोधमोहीम सुरू केली अन् नाशिक जिल्ह्यातील राहणाऱ्या नातेवाईकांच्या ताब्यात महिलेला देण्यात आले, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल कोळी यांनी दिली.

    हे सुद्धा वाचा