नाथाभाऊंनी राष्ट्रवादीत गेल्यावर तरी खरं बोलावं : चंद्रकांत पाटील

नाथाभाऊ आमचे नेते आहेत. तिकडे गेल्यावर तरी त्यांनी खरं बोलावं. दीड वर्षात त्यांनी एकही आंदोलन केलं नाही. आम्ही अनेक आंदोलने केली. पंढरपूरही जिंकलो, असं सांगतानाच आम्हाला फसवलं गेलं याचं आम्हाला दु:ख आहे. आमच्याशी धोका झाला. पण भाजपमध्ये कोणत्याही प्रकारची अस्वस्थता नाही, असं स्पष्टीकरण चंद्रकांत पाटील यांनी दिलं आहे.

    मुंबई : भाजपला रामराम ठोकून राष्ट्रावादीत प्रवेश केलेल्या एकनाथ खडसे यांनी भाजपला चांगलंच धारेवर धरलं आहे. मागील काही काळापासून ते सातत्याने भाजपवर टीका करताना दिसत आहेत. आता सत्ता गेल्यापासून भाजपमध्ये अस्वस्था आहे, अशी टीका राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी केली होती. त्यांच्या या टीकेला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उत्तर दिलं आहे.

    चंद्रकांत पाटलांचं स्पष्टीकरण

    नाथाभाऊ आमचे नेते आहेत. तिकडे गेल्यावर तरी त्यांनी खरं बोलावं. दीड वर्षात त्यांनी एकही आंदोलन केलं नाही. आम्ही अनेक आंदोलने केली. पंढरपूरही जिंकलो, असं सांगतानाच आम्हाला फसवलं गेलं याचं आम्हाला दु:ख आहे. आमच्याशी धोका झाला. पण भाजपमध्ये कोणत्याही प्रकारची अस्वस्थता नाही, असं स्पष्टीकरण चंद्रकांत पाटील यांनी दिलं आहे.

    खडसे काय म्हणाले ?

    खरं सांगायचं तर राज्यातील आघाडी सरकार दिवसेंदिवस मजबूत होत आहे. भाजपधील आमदारांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. नाराजांची संख्या वाढू नये म्हणून आपलं सरकार येणार असं आमदारांना सांगून वेळ मारून नेली जात आहे, असं खडसे म्हणाले होते. फडणवीसांनी सत्ता स्थापनाची चूक मान्य केली आहे. पण चूक मान्य केल्यानंतरही अजूनही असा प्रसंग आला किंवा एखाद्या पक्षाने त्यांना ऑफर दिली तरी ते सत्ता स्थापन करतील, असा टोला त्यांनी लगावला आहे. दरम्यान, देवेंद्र फडणवीस सत्ता गेल्यापासून अस्वस्थ आहेत. सत्तेत आलं पाहिजे म्हणून त्यांनी अजित पवारांसोबत सत्ता स्थापन केली. आजही सरकार स्थापन करण्याची त्यांची तळमळ दिसत आहे, असा टोला देखील खडसेंनी लगावला होता.