Ten infants die in fire at Bhandara District Hospital's child care unit Chief Minister Uddhav Thackeray's inquiry order

ही घटना कुणाच्या दुर्लक्षामुळे घडली? या घटनेची अंतिम जबाबदारी कुणाची? कुठल्या अधिकाऱ्यांवर इथल्या सुरक्षेची जबाबदारी होती? त्या अधिकाऱ्यांवर काय कारवाई केली? घटनेच्या चौकशीतून कुठले निष्कर्ष समोर आले? असे सवाल राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं या नोटीशीत विचारलेत. राज्य सरकार आणि पोलीस महासंचालकांना ही नोटीस पाठवण्यात आलीय. बेफिकीर अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करा, अशी सूचनादेखील यातून देण्यात आलीय.

भंडारा हॉस्पिटल जळीतकांड प्रकरणी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं राज्य सरकारला नोटीस पाठवलीय. भंडाऱ्यातील घटनेला जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणीदेखील या नोटिशीत करण्यात आलीय.

ही घटना कुणाच्या दुर्लक्षामुळे घडली? या घटनेची अंतिम जबाबदारी कुणाची? कुठल्या अधिकाऱ्यांवर इथल्या सुरक्षेची जबाबदारी होती? त्या अधिकाऱ्यांवर काय कारवाई केली? घटनेच्या चौकशीतून कुठले निष्कर्ष समोर आले? असे सवाल राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं या नोटीशीत विचारलेत. राज्य सरकार आणि पोलीस महासंचालकांना ही नोटीस पाठवण्यात आलीय. बेफिकीर अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करा, अशी सूचनादेखील यातून देण्यात आलीय.

भंडाऱ्यात महाराष्ट्राला हादरवून सोडणारी घटना घडली होती. भंडारा जिल्हा रुग्णालयाच्या शिशु केअर युनिटला मध्यरात्री आग लागली. या आगीमध्ये दहा नवजात बालकांना आपला प्राण गमवावा लागला. मध्यरात्री दोन वाजता भंडाऱ्यातील जिल्हा सामान्य रुग्णालयात ही दुर्घटना घडली. नवजात शिशु केअर युनिट मध्ये अचानक आग लागली आणि बघता बघता या आगीने पेट घेतला.

शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचे कारण आत्तापर्यंत समोर येत आहे. युनिटमधून धूर निघत असल्याचं रुग्णालयात असलेल्या नर्सच्या लक्षात आलं. नर्सनं दार उघडून बघितलं त्यावेळी सगळीकडे प्रचंड धूर झाला होता अधिकाऱ्यांना तातडीने याची माहिती देण्यात आली आणि त्यानंतर हालचाली सुरू झाल्या.

अग्निशमन दलानं तातडीने रुग्णालयाकडे धाव घेतली. रुग्णालयातील नागरिकांच्या मदतीने बचावकार्य देखील सुरू करण्यात आलं. अतिदक्षता विभागात दोन युनिट आहेत. त्यापैकी मॉनिटरमध्ये असलेल्या बालकांना वाचवण्यात यश आलं होतं, तर आउटगोइंग युनिटमधील १०  नवजात बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या घटनेने केवळ महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण देशभर हळहळ पसरलीय.