राजनाथ सिंह यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी आक्रमक; संरक्षणमंत्र्यांना पोस्टाने पाठवले शिवचरित्र

छत्रपती शिवाजी महाराज यांना खेळाचे शिक्षण रामदास स्वामी आणि दादोजी कोंडदेव यांनी दिले, असा इतिहासाचा दाखला खेल खेल मे पुणे येथील एका कार्यक्रमात देणारे देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ देशभर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. मुंबईतही घाटकोपर परिसरात सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश प्रवक्ते अ‍ॅड. अमोल मातेले यांच्या नेतृत्वात तीव्र आंदोलन छेडण्यात आले.

    मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज यांना खेळाचे शिक्षण रामदास स्वामी आणि दादोजी कोंडदेव यांनी दिले, असा इतिहासाचा दाखला खेल खेल मे पुणे येथील एका कार्यक्रमात देणारे देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ देशभर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. मुंबईतही घाटकोपर परिसरात सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश प्रवक्ते अ‍ॅड. अमोल मातेले यांच्या नेतृत्वात तीव्र आंदोलन छेडण्यात आले. यावेळी जय जय जय भवानी, जय शिवाजी, जय जिजाऊ, जय शिवराय अशा गगनभेदी घोषणा देताना राजनाथ सिंह यांनी दिलेला खोटा ऐतिहासिक दाखला राष्ट्रवादीने खोडून काढला.

    राष्ट्रवादीने एक अभिनव आंदोलन छेडताना संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या खोट्या इतिहासाचा तीव्र शब्दांत निषेध नोंदवला. छत्रपती शिवाजी महाराज यांना गुरूस्थानी फक्त त्यांचे वडील शहाजीराजे, राजमाता जिजाउचा होत्या. त्यांनीच त्यांना तलवारबाजी, दांडपट्टा तसेच कला आणि राजकारणाचे धडे दिले. त्यांना सर्व विद्यांत निपुण केले. महात्मा जोतीराव फुले, शाहीर अमरशेख, ज्येष्ठ विचारवंंत डॉ. आ. ह. साळुंखे यांनी इतिहासाची जी काही मांडणी केली आहे त्यात याचे सत्य आणि वास्तवावर आधारित दाखले सापडतात, असे अ‍ॅड अमोल मातेले यांनी यावेळी बोलताना सांगितले.

    राजनाथ सिंह यांना शिवचरित्राची भेट

    देशाचे संरक्षण मंत्री या नात्याने राजनाथ सिंह यांनी कुणीही लेखी खोटा,धांदात दिलेला इतिहास वाचण्याचे काम केले. यामुळे समाजात तेढ निर्माण झाली असून याचा आम्ही तीव्र शब्दांत निषेध करतो, अशा प्रतिक्रिया अ‍ॅड.अमोले मातेले यांच्यासह राष्ट्रवादीचे घाटकोपर तालुका कार्याध्यक्ष अनुबाई दळवी, दिलीप सातपुते,दत्तात्रय शेलार,अल्ताफ शेख,लक्ष्मण पवार,राहुल सावने, इम्रान तडवी,हनीफ पटेल,प्रसाद गायकवाड, संजय लोंढे कार्यकर्त्यांनी दिल्या.भाररतीय टपाल कार्यालय घाटकोपर स्टेशन पश्विम येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सोमवार 30 ऑगस्ट रोजी राजनाथ सिंह यांच्या निषेधार्थ घोषणा दिल्या.

    यावेळी राजनाथ सिंह यांच्या ऐतिहासिक ज्ञानात भर पडावी, त्यांनी खरा इतिहास समजून घ्यावा यासाठी विश्ववंद्य छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनाचा आलेख मांडणारे शिवचरित्र राजनाथ सिंह यांना पोस्टाने पाठवण्याचा अभिनव उपक्रम राष्ट्रवादीतर्फे राबविण्यात आला.