Jewels that have not been hallmarked should not be cracked down on until then; High Court directs Central Government

केंद्र सरकारने ग्राहकांना शुद्ध सोन्याच्या दागिन्यांवर शुद्ध सोन्याची हमी देणारे ‘हॉलमार्किंग’ बंधनकारक केले आहे. परंतु, हॉलमार्किंग सेंटर्सची कमतरता आणि जटील नियमांमुळे सोन्याच्या व्यावसाियकांमध्ये आक्रोश आहे. भारतीय मानक ब्यूरोद्वारे (बीआयएस) देशातील हॉलमार्किंग प्रक्रियेला मनमानी पद्धतीने बंधनकारक केल्याच्या विरोधात व्यावसायिकांनी सोमवारी एक दिवसीय उपोषणाचा इशारा दिला आहे.

    मुंबई : केंद्र सरकारने ग्राहकांना शुद्ध सोन्याच्या दागिन्यांवर शुद्ध सोन्याची हमी देणारे ‘हॉलमार्किंग’ बंधनकारक केले आहे. परंतु, हॉलमार्किंग सेंटर्सची कमतरता आणि जटील नियमांमुळे सोन्याच्या व्यावसाियकांमध्ये आक्रोश आहे. भारतीय मानक ब्यूरोद्वारे (बीआयएस) देशातील हॉलमार्किंग प्रक्रियेला मनमानी पद्धतीने बंधनकारक केल्याच्या विरोधात व्यावसायिकांनी सोमवारी एक दिवसीय उपोषणाचा इशारा दिला आहे.

    हॉलमार्किंगच्या जटील नियमांविरोधात रत्नाभूषण उद्योग एकटूज झाला आहे. उद्योगाच्या सर्व संस्थांनी मिळून नॅशनल टास्क फोर्स ऑन हॉलमार्किंगची स्थापना केली आहे. जीजेसी आणि जीजेएससीआयचे संचालक दिनेश जैन यांनी सांगितले की, देशभरातून ६ लाख आणि मुंबईतील २५ हजार ज्वेलर्स उपोषणात सहभागी होणार आहेत. ऑल इंडिया जेम अॅण्ड ज्वेलरी डोमेस्टिक कौन्सिलचे माजी अध्यक्ष आणि टास्क फोर्सचे अशोक मीनावाला यांनी सांिगतले की, आमचा विरोध हॉलमार्किंगसाठी नाही, आम्ही त्याचे स्वागतच करतो.

    आमचा विरोध हॉलमार्किंग युनिक आयडीसाठी (एचयूआयडी) आहे. कारण एचयूआयडी आमच्यासाठी एक ‘विनाशकारी प्रकि्रया’ आहे, जे की सध्याच्या बंधनकारक हॉलमार्किंग प्रक्रियेत दागिन्यांना कोणतीही सुरक्षा प्रदान करत नाही. नोंदणी रद्द करणे, दंडात्मक प्रावधान, तपास आणि जप्तीचे कडक नियम शेवटी उद्योगात ‘इन्स्पेक्टर राज’ आणेल. एचयूआडीच्या मनमानी कारभाराविरोधात आमचा शांतीपूर्ण विरोध राहिल, असे त्यांनी सांगितले.

    मुंबई होलसेल गोल्ड ज्वेलरी असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश कागरेचा यांनी सांगितले की, ज्वेलर्स यांना देखील होलमार्किंग हवे आहे. तेव्हाच नोंदणीत सुमारे २५० टक्क्यांची वाढ झाली आहे आणि नोंदणीकृत ज्वेलर्सची संख्या ८८ हजार झाली आहे. तर ८३ सेंटर्सला निलंबित किंवा रद्द केले आहे. नवीन हॉलमार्किंग प्रक्रियेत विक्री होणारे दागिने कापणे, वितळवणे आणि स्क्रॅप करण्याचा समावेश आहे. दागिन्यांवरून ज्वेलरचे नाव हटवणे हे ग्राहकांच्या दृष्टीनेही हितकारी नाही. विशेषत: जेव्हा ग्राहक दागिने विकतात किंवा गहाण ठेवतात, तेव्हा याचा फार उपयोग होतो, असे ते म्हणाले.