Natural calamity on Mumbai; Ridge of leaders to visit accident victims!

दुर्घटनास्थळाला मुंबई उपनगराचे पालकमंत्री आदित्य ठाकरे आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी भेट दिली. यावेळी उंच डोंगरांवर धोकादायक स्थितीत राहणाऱ्या नागरिकांचे स्थलांतर करण्यात येईल असे आदित्य ठाकरे आणि नवाब मलिक यांनी सांगितले. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चेंबूर आणि विक्रोळी परिसरातील दु्र्घटनांमध्ये बळी गेलेल्या मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत घोषित केली आहे. त्याचप्रमाणे विरोधी पक्षातील आमदार अशिष शेलार, माजी खासदार किरिट सोमैय्या यांच्यासह महापौर, नगरसेवक आमदार अश्या व्हिआयपींच्या भेटींचा दिवसभर या दुर्घटनास्थळी राबता राहिला.

    मुंबई : मुंबईतील चेंबूर आणि विक्रोळी तसेच भांडूप परिसरात पावसामुळे भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनांबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. या दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या नागरिकांच्या कुटुंबियांबद्दल संवेदना व्यक्त केल्या. या दुर्घटनेतील मृताच्या कुटुंबियांना शासनातर्फे पाच लाख रुपयांची मदत केली जाणार आहे. तर जखमींवर मोफत उपचार करण्यात येणार आहे, अशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले आहे, अशी माहितीही उपमुख्यमंत्र्यांनी दिली.

    या घटनेनंतर मुंबईचे मंत्री नबाब मलिक, पालकमंत्री आदित्य ठाकरे, अस्लम शेख यानी घटनास्थळी पाहणी केली तर विरोधीपक्ष नेते प्रविण दरेकर यांनी व्टिट करत सरकारवर टिका केली. विरोधी पक्ष नेते आशीष शेलार किरिट सोमैय्या यांच्यासह व्हिआयपीनी दुर्घटना स्थळ पर्यटन करण्यात दिवस संपला.

    मुंबईतल्या चेंबूरच्या आरसीएफ परीसरातल्या भारतनगरमध्ये आणि विक्रोळी येथे दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेनंतर एनडीआरएफ, अग्निशमन, महापालिका, पोलिस इत्यादी यंत्रणांतर्फे तात्काळ बचाव आणि मदतकार्य सुरु करण्यात आले. अनेकांना ढिगाऱ्याखालून सुखरुप बाहेर काढण्यात बचाव पथकांना यश आले. आपत्कालिन यंत्रणांकडून दुर्घटनास्थळीही तात्काळ बचावकार्य सुरु करण्यात आल्याची माहितीही उपमुख्यमंत्र्यांनी दिली. दुर्घटनेतील जखमींवर शासनामार्फत मोफत उपचार करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

    मुंबई शहर आणि राज्यातील अनेक जिल्ह्यात सुरु असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा आपत्कालीन यंत्रणांनी सतर्क राहून परस्पर समन्वयाने काम करावे. नागरिकांनीही सुरक्षितताविषयक नियम आणि संदेशांचे पालन करुन काळजी घ्यावी. आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ पोलीस किंवा नजिकच्या शासकीय यंत्रणेशी संपर्क साधावा, असे आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी केले आहे.

    दरम्यान, दुर्घटनास्थळाला मुंबई उपनगराचे पालकमंत्री आदित्य ठाकरे आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी भेट दिली. यावेळी उंच डोंगरांवर धोकादायक स्थितीत राहणाऱ्या नागरिकांचे स्थलांतर करण्यात येईल असे आदित्य ठाकरे आणि नवाब मलिक यांनी सांगितले. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चेंबूर आणि विक्रोळी परिसरातील दु्र्घटनांमध्ये बळी गेलेल्या मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत घोषित केली आहे. त्याचप्रमाणे विरोधी पक्षातील आमदार अशिष शेलार, माजी खासदार किरिट सोमैय्या यांच्यासह महापौर, नगरसेवक आमदार अश्या व्हिआयपींच्या भेटींचा दिवसभर या दुर्घटनास्थळी राबता राहिला.