नवराष्ट्रच्या बातमीमुळे टळली विक्रोळीच्या रेशनिंग दुकानावरील गर्दी

मुंबई: कोरोना विषाणूमुळे जनतेवर आर्थिक संकटदेखील ओढावले आहे. त्यामुळे सरकारने जनतेला दिलासा देण्यासाठी अन्नधान्य रेशन दुकानावर मोफत उपलब्ध करून दिले आहे. ते घेण्यासाठी रेशन दुकानावर तोबा गर्दी होत

मुंबई: कोरोना विषाणूमुळे जनतेवर आर्थिक संकटदेखील ओढावले आहे. त्यामुळे सरकारने जनतेला दिलासा देण्यासाठी अन्नधान्य रेशन दुकानावर मोफत उपलब्ध करून दिले आहे. ते घेण्यासाठी रेशन दुकानावर तोबा गर्दी होत असून कोरोनाचे आम्हाला भय नाही असे समजून सोशल डिस्टन्सिंग न पाळता फक्त मोफत धान्य लाभ घेण्यासाठी धान्य दुकानावर एक झुंबड उडत आहे. विक्रोळी टागोरनगरमधील अशोक नगर झोपडपट्टी येथील एका रेशन दुकानावर अशीच काहीशी गर्दी दिसून आली होती.

सोशल डिस्टन्सिंगचे पालन ग्राहक करताना दिसत नसल्याने विक्रोळीमध्येसुद्धा कोरोना रुगणांची संख्या वाढताना दिसत आहे. त्यातच रेशनिंग दुकानावर ग्राहकांची झुंबड उडाली होती. या प्रकरणामुळे कोरोना टाळण्याऐवजी आपण या गर्दीमुळे आणखीनच भर पडत आहोत हे प्रत्येकाने समजून घेणे गरजेचे आहे. गरीब आणि गरजू लोकांना लढाईमध्ये अन्नधान्याचा तुटवडा भासू नये म्हणून रेशन दुकानावर मोफत धान्य दिले जात आहे. अन्नधान्य शिवाय उपासमारीची वेळ कोणावरही येऊ नये. या उद्देशाने राज्य सरकारने रेशनिग दुकानावर मोफत धान्य वाटप सुरू केले आहे .प्रत्येकाने आपली जबाबदारी म्हणून कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी व त्यास हाकलून लावण्यासाठी प्रत्येकाने डिस्टन्सिंग पाळणे गरजेचे आहे अशीच बातमी दै नवराष्ट्र वृत्तपत्रात छापली गेली होती याच बातमीचा परिणाम आता दिसून आला आहे. रेशनिंग देणाऱ्या दुकान मालकाने आता रेशनिंग घेण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांना टोकन नंबर दिले असून प्रत्येकी २० ग्राहकांना वेळ दिली आहे. त्या वेळेवर बोलवून त्यांना रेशनिंग दिले जात आहे. आता कुठेतरी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करताना स्वत: ग्राहकदेखील दिसत आहे.
सकाळीदेखील ग्राहकांची गर्दी मोठया प्रमाणात झाली होती. परंतु पेपरात आलेली बातमी मला भेटल्यानंतर ग्राहकांना विश्वासात घेऊन त्यांना सर्वांना टोकन नंबर देऊन त्या सर्व ग्राहकांना वेळ देऊन आता बोलवत आहे व आता ह्याच्या पुढे गर्दी होणार नाही सर्वांना टोकन नंबर नुसारच धान्य दिले जाणार आहे. परंतु माझी सर्व रेशनिग दुकानदारांना विनंती आहे. आपण सुद्धा दुकानासमोर ग्राहकांची गर्दी न करता त्यांना टोकन नंबर नुसारच  धान्य द्यावे त्यामुळे कुठल्याही प्रकारची गर्दी होणार नाही व  सोशल डिस्टंगसिंगचे पालन देखील केले जाईल. – विश्राम भानुशाली