navratri garaba dandiya cancelled due to corona virus
यंदा हे करावंच लागणार, नवरात्रोत्सवात ‘घरबा’!(Garaba) दांडिया, आगमन-विसर्जन मिरवणुकीला बंदी

कोरोनाचा (corona) प्रभाव असताना यावर्षी नवरात्रोत्सव (navratri utsav) साजरा होत असल्यामुळे पालिकेने (mcgm) गणेशोत्सवाप्रमाणेच नवरात्रीसाठी कठोर नियमावली (rules & regulation) जाहीर केली आहे. राज्य सरकारने (state government) दांडियाला (dandia) याआधीच बंदी (ban) घातली असून पालिकेकडून देवीची घरगुती मूर्ती २ फूट तर सार्वजनिक मंडळांची मूर्ती ४ फूटच ठेवावी असे निर्देश देण्यात आले आहेत.

मुंबई: कोरोनाचा (corona) प्रभाव असताना यावर्षी नवरात्रोत्सव (navratri utsav) साजरा होत असल्यामुळे पालिकेने (mcgm) गणेशोत्सवाप्रमाणेच नवरात्रीसाठी कठोर नियमावली (rules & regulation) जाहीर केली आहे. राज्य सरकारने (state government) दांडियाला (dandia) याआधीच बंदी (cancelled) घातली असून पालिकेकडून देवीची घरगुती मूर्ती २ फूट तर सार्वजनिक मंडळांची मूर्ती ४ फूटच ठेवावी असे निर्देश देण्यात आले आहेत. याशिवाय कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक असणारे सोशल डिस्टंन्स (social distance) पाळणे, मास्क वापरणे (mask) आणि वेळोवेळी निर्जंतुकीकरण (sanitization) असे खबरदारीचे नियम पाळणे बंधनकारक करण्यात आले आहे. यामुळे यंदा नवरात्रोत्सवात ‘घरबा’ होणार आहे.

मुंबईत नियंत्रणात आलेला कोरोना गणेशोत्सवापासून पुन्हा वाढू लागल्याने पालिकेसमोर नव्याने आव्हान निर्माण झाले आहे. यातच १७ ऑक्टोबरपासून नवरात्रोत्सव सुरू होणार असल्यामुळे गर्दी वाढून कोरोनाचा प्रभाव आणखी वाढण्याचा धोका आहे. या पार्श्वभूमीवर पालिकेने यावर्षीच्या नवरात्रोत्सवासाठी मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. यामध्ये मास्क लावणे, दोन व्यक्तींमध्ये २ मीटरचे अंतर आणि वारंवार साबणाने हात धुणे या त्रिसूत्रीचा अवलंब करावा असे आवाहन पालिकेच्या वतीने उप आयुक्त हर्षद काळे यांनी केले आहे.

मूर्तीकारांनाही हमीपत्र द्यावे लागणार

गणेशोत्सवादरम्यान मूर्ती तयार करण्यासाठी तात्पुरते मंडप (मूर्तीकारांचे मंडप) उभारण्यासाठी देण्यात आलेल्या परवानगीप्रमाणेच नियम राहणार आहेत. यानुसार ३० सप्टेंबरपासून मंडप उभारणीची परवानगी देण्यात आली आहे. यामध्ये मागील वर्षी परवानगी घेतलेल्या मूर्तीकारांना यावर्षी स्थानिक पोलीस, वाहतूक पोलीस यांची परवानगी घेण्याची गरज राहणार नाही.

मात्र नवीन मूर्तीकारांना स्थानिक पोलीस, वाहतूक पोलीस यांची परवानगी घ्यावी लागेल. शिवाय ‘कोविड’च्या पार्श्वभूमीवर नियम पाळणार असल्याचे हमीपत्र द्यावे लागणार आहे. पारंपरिक मूर्तिकारांना परवानगी देण्यात येत असून अन्यत्र तयार केलेल्या मूर्ती निव्वळ विक्रीसाठी मंडप उभारण्याची परवानगी देण्यात येणार नाही.

हे फॉलो करावेच लागणार

१) गरबा, दांडिया, सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करू नये

२) सार्वजनिक मंडळांनी ऑनलाइन दर्शनाला प्राधान्य द्यावे

३) देवीच्या आगमन, विसर्जन मिरवणुकीला बंदी

४) ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेची जनजागृती

५) आरोग्य विषयक उपक्रमांचे आयोजन करावे

६) मंडपात थर्मल स्क्रिनिंग, निर्जंतुकीकरणची व्यवस्था

७) मंडपात एका वेळी ५ पेक्षा जास्त कार्यकर्ते नको