Nawab Malik advises Rane to be careful

आर्यन खानप्रकरणावर नवाब मलिक का बोलत आहेत? आर्यन मुस्लिम असल्यामुळे मलिक बोलत आहेत का? सुशांतसिंग राजपूत हिंदू होते म्हणून गप्प होतात का?, असा सवाल भाजपा नेते नीतेश राणे यांनी केला होता. त्यावर राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक(Nawab Malik ) यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

    मुंबई : आर्यन खानप्रकरणावर नवाब मलिक का बोलत आहेत? आर्यन मुस्लिम असल्यामुळे मलिक बोलत आहेत का? सुशांतसिंग राजपूत हिंदू होते म्हणून गप्प होतात का?, असा सवाल भाजपा नेते नीतेश राणे यांनी केला होता. त्यावर राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक(Nawab Malik ) यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

    नीतेश, माझा तुम्हाला सल्ला आहे. असे कुणाला फ्रेम करू नका. सावध राहा. हे लोक कधी तुमच्या घरात घुसतील आणि तुमचेच लोक कधी तुरुंगात जातील हे तुम्हाला कळणारही नाही, अशी समज मलिक यांनी नीतेश राणेंना दिली आहे.

    नितेश राणे जे बोलत आहेत ती हीच तर कारणे आहेत त्यांना फसवण्याची. मला वाटते भाजपाने हे सर्व फ्रेम केले आहे. भाजपा नेते ज्या पद्धतीने बोलत आहेत, त्यातून हे सिद्ध होत आहे. मी नीतेश राणेंना सल्ला देतो, सावध राहा. कधी तुमच्या घरात कुणी घुसेल आणि तुमचेच लोकं तुरुंगात जातील हे कळणारही नाही. त्यामुळे आपण सावध राहिले पाहिजे असे नवाब मलिक म्हणाले.

    भंगारच्या धंद्याचा अभिमान

    यावेळी त्यांनी भाजपा नेते मोहीत कंबोज यांच्यावरही टीका केली. कंबोज यांनी मलिक हे भंगारवाला आहेत, असे म्हटले होते. त्याला प्रत्युत्तर देताना मलिक म्हणाले की, होय, माझे वडील भंगारचा धंदा करायचे. त्याचा मला अभिमान आहे. मी कधी कुणाला लुटले नाही. मी बँकेचे पैसे बुडवले नाही. ज्यांच्यावर सीबीआयच्या धाडी पाडल्या ते माझ्या कुटुंबीयाचा धंदा काढत आहेत. मी भंगारचा धंदा करतो. पण आम्ही सोन्यात कुणाला बुडवले नाही, अशी टीका त्यांनी केली.