Nawab Malik in safe zone; Sharad Pawar defended himself
Maharashtra, Jan 23 (ANI): NCP Chief Sharad Pawar along with party leader Nawab Malik addresses a meeting of the NCP's minority cell, in Mumbai on Thursday. (ANI)

अल्पसंख्याक व कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांना एनसीबीने अटक केली आहे. बॉलीवुड ड्रग्ज कनेक्शन प्रकरणी जावयाला अटक झाल्याने नवाब मलिक अडचणीत सापडले होते. मात्र, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिलेल्या प्रतिक्रियेमुळे नवाब मलिक सेफ झोन मध्ये आले आहेत.

मुंबई : अल्पसंख्याक व कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांना एनसीबीने अटक केली आहे. बॉलीवुड ड्रग्ज कनेक्शन प्रकरणी जावयाला अटक झाल्याने नवाब मलिक अडचणीत सापडले होते. मात्र, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिलेल्या प्रतिक्रियेमुळे नवाब मलिक सेफ झोन मध्ये आले आहेत.

बॉलीवुड ड्रग्ज कनेक्शन प्रकरणी जावयाला अटक झाल्याने नवाब मलिक यांच्यावर देखील टीका होत होती. तसेच मलिकांवर काय कारवाई होणार असा प्रश्न देखील उपस्थित केला जात होता. यावर आता शरद पवारांनीत उत्तर दिले आहे.

नवाब मलिक यांच्यावर वैयक्तिक आरोप किंवा तक्रार नाहीत, त्यांच्या नातेवाईकांवर आरोप आहेत, त्यांनी यंत्रणेला पूर्ण सहकार्य केले असे म्हणत शरद पवार यांनी नवाब मलिक यांचा बचाव केला आहे.

ब्रिटीश नागरिक आणि ड्रग सप्लायर करण सजनानी प्रकरणात समीरला अटक झाली आहे. एनसीबीच्या सूत्रांच्या माहितीनुसार, करण सजनानी आणि समीर या दोघांमधील ड्रग्ज बाबतटचे चॅट आणि पैशांची देवाण-घेवाणचे पुरावे सापडले आहेत.

एनसीबीने शनिवारी एका ब्रिटिश नागरिकासह तीन लोकांना अटक केली. या तिघांकडून मोठ्या प्रमाणात ड्रग्स जप्त करण्यात आलं आहे. या तिघांमध्ये ब्रिटिश नागरिक करण सजनानीसह दिया मिर्जाची एक्स मॅनेजर राहिला फर्निचरवाला आणि तिची बहिण शाईस्ता फर्निचरवाला यांचा समावेश आहे. त्याच्याकडून अमेरिकेतून मागवण्यात आलेला, अतिशय महाग खास प्रकारचा गांजा जप्त करण्यात आला आहे.
मुच्छड पानवाला अटक करण्यात आलेल्या राहिला फर्निचरवाला हिच्या संपर्कात होता.

मुच्छड पानवालाच्या चौकशीनंतर एनसीबीने समीर खान यांना समन्स बजावलाय. तपासादरम्यान करण सजनानी आणि समीर खान यांच्यात गुगल पेच्या माध्यमातून २० हजारांचा व्यवहार झाला असल्याचं समोर आलं. ड्रग्जसाठी हा व्यवहार झाल्याचा एनसीबीला संशय आहे.