राज्याला रेमडेसिवीरचा साठा वाढवून दिल्याबद्दल नवाब मलिकांनी केंद्राचे मानले आभार…

    मुंबई : केंद्राने रेमडेसिवीरचा साठा वाढवून दिला त्याबद्दल केंद्राचे आभार मात्र आम्ही सांगितलेला ५० हजाराचा साठा दिला तर राज्याची अडचण दूर होईल, असे मत अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी व्यक्त केले आहे.

    दरम्यान केंद्र सरकारच्या वतीने राज्यांना वाटप करण्यात येणारा रेमडेसिवीरचा डाटा जाहीर करण्यात आला होता. त्यावर राष्ट्रवादीने राज्यातील कोरोनाची गंभीर परिस्थिती लक्षात घेता देण्यात येणारा साठा कमी असल्याचे निदर्शनास आणून दिले होते. त्यावर केंद्राने शनिवारी २६ हजार दरदिवशी देणार होते त्यात ४० हजार अशी वाढ जाहीर केली आहे. यातून जो तुटवडा निर्माण झाला आहे तो काही प्रमाणात कमी होईल. मात्र दरदिवशी ५० हजार रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा व्हावा अशी मागणी आहे. त्यामुळे ४० हजार दिले आहे.

    तसेचं त्यामध्ये १० हजाराची वाढ केल्यास राज्याची अडचण दूर होणार आहे. रेमडेसिवीरचा दहा हजाराचा साठा लवकरात लवकर मिळावा यासाठी मुख्यमंत्री स्वतः केंद्राकडे मागणी करत असल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले.