nawab malik

अल्पसंख्यांक विकासमंत्री नवाब मलिक(nawab malik) यांचे जावई समीर खान(sameer khan) यांना ड्रग्ज प्रकरणात बुधवारी अटक करण्यात आली.जावयाला अटक झाल्यानंतर नवाब मलिक यांनी ट्विट करुन प्रतिक्रिया(nawab malik reaction) दिली आहे. 

अल्पसंख्यांक विकासमंत्री नवाब मलिक(nawab malik) यांचे जावई समीर खान(sameer khan) यांना ड्रग्ज प्रकरणात बुधवारी अटक करण्यात आली. समीर खान हे नवाब मलिक यांची मुलगी निलोफर यांचे पती आहेत. समीर खान यांना समन्स बजावत चौकशीला हजर राहण्यास सांगण्यात आलं होतं. चौकशीनंतर त्यांना अटक करण्यात आली.

जावयाला अटक झाल्यानंतर नवाब मलिक यांनी ट्विट करुन प्रतिक्रिया(nawab malik reaction) दिली आहे.  ते ट्विटमध्ये म्हणतात की, “कोणीही कायद्यापेक्षा मोठं नाही आणि कोणताही भेदभाव न करता प्रत्येकाला ही गोष्ट लागू असावी. कायदा आपलं काम करेल आणि न्याय होईल. मी न्यायव्यवस्थेचा आदर करत असून त्यावर पूर्ण विश्वास आहे”.


एनसीबीकडून सोमवारी मुच्छड पानवाल्याची चौकशी करण्यात आली आणि नंतर समीर खान यांच्या अटकेची कारवाई झाली.