छगन भुजबळ म्हणाले की, पवार कुटुंब सगळं एकत्रित आहे, चांगलं आहे. आम्ही सुद्धा त्याच कुटुंबातील सभासद आहोत. अजितदादा पण दुखावलेले नाहीत. कोणी दुखावलेले नाहीत, सगळे एकत्रित आहोत. कुटुंबातील सदस्यांना बोलण्याचं, सुचवण्याचं आणि समजावण्याचं काम वरिष्ठ माणसं करतच असतात.

अभिनेता सुशांत सिंग मृत्यूप्रकरणी शरद पवार यांचा नातू पार्थ पवारने सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. परंतु पार्थच्या बोलण्याला आम्ही कवडीचीही किंमत देत नाही, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली. या टीकेनंतर राजकीय वर्तुळात खलबतं पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी पार्थ पवार यांचं वर्णन नया है वह या शब्दात वर्णन केलं आहे.

छगन भुजबळ म्हणाले की, पवार कुटुंब सगळं एकत्रित आहे, चांगलं आहे. आम्ही सुद्धा त्याच कुटुंबातील सभासद आहोत. अजितदादा पण दुखावलेले नाहीत. कोणी दुखावलेले नाहीत, सगळे एकत्रित आहोत. कुटुंबातील सदस्यांना बोलण्याचं, सुचवण्याचं आणि समजावण्याचं काम वरिष्ठ माणसं करतच असतात. शरद पवारांनी सांगितल्यावर मी पुन्हा त्यावर काही बोलण्याची, सांगण्याची गरज नाही. शरद पवारांनी ते थोडे अपरिपक्व असल्याचं म्हटलं आहे. हिंदीत सांगायचं झालं तर ‘नया है वह’. 

https://www.navarashtra.com/state-news-marathi/i-have-100-percent-trust-on-mumbai-police-sharad-pawar-20803/ हे देखील वाचा.

दरम्यान, शरद पवार यांनी जाहीररित्या फटकारल्यानंतर पार्थ पवार यांच्या प्रतिक्रियेची प्रतीक्षा होती. परंतु शरद पवारांच्या वक्तव्यावर कोणतंही भाष्य करण्यास पार्थ पवार यांनी नकार दिला. मला यावर काही बोलायचं नाही, असं पार्थ पवार यांनी सांगितलं.