बॉलिवूड ड्रग्ज कनेक्शन : नवाब मलिकांच्या जावयाला एनसीबीने केली अटक; १० तासांच्या चौकशीनंतर कारवाई

ड्रग्ज प्रकरणात मुंबईतील प्रसिद्ध मुच्छड पानवालावर कारवाई केल्यानंतर समीर खान अडचणीत आले होते. समीर खान हे नवाब मलिक यांची मुलगी निलोफर यांचे पती आहेत.

अल्पसंख्याक व कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांना एनसीबीने समन्स बजावले होते. आज त्यांची १० तास चौकशी सुरू होती. त्यानंतर एनसीबीने त्यांना नुकतीच अटक  केली आहे.

ड्रग्ज प्रकरणात मुंबईतील प्रसिद्ध मुच्छड पानवालावर कारवाई केल्यानंतर समीर खान अडचणीत आले होते. समीर खान हे नवाब मलिक यांची मुलगी निलोफर यांचे पती आहेत.

मुच्छड पानवालाच्या चौकशीनंतर एनसीबीने समीर खान यांना समन्स बजावले होते. तपासादरम्यान करण सजनानी आणि समीर खान यांच्यात गुगल पेच्या माध्यमातून २० हजारांचा व्यवहार झाला असल्याचं समोर आलं. ड्रग्जसाठी हा व्यवहार झाल्याचा एनसीबीला संशय आहे. समीर खान यांना यासाठीच समन्स बजावण्यात आलं होतं आणि त्यांची चौकशी सुरू होती.