मुंबई आणि गोव्यात एनसीबीचे छापे, सात जणांना अटक

मुंबई (Mumbai) आणि गोव्यात (Goa) अंमली पदार्थविरोधी (Drugs) एनसीबीकडून (NCB)  छापे घालण्यात आले आहेत. तसेच यामध्ये एकूण सात जणांना अटक करण्यात आली आहे.अटक केलेल्यांपैकी करमजीतसिंह आनंद (२३) मुंबईतील उच्चभ्रू व्यक्तींना अमली पदार्थ पुरवणारा प्रमुख विक्रेता असून त्याचा सुशांत प्रकरणाशी थेट संबंध असल्याचा दावा एनसीबीने केला.

अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू (Sushant Singh Rajput) प्रकरणात मुंबई (Mumbai) आणि गोव्यात (Goa) अंमली पदार्थविरोधी (Drugs) एनसीबीकडून (NCB)  छापे घालण्यात आले आहेत. तसेच यामध्ये एकूण सात जणांना अटक करण्यात आली आहे.अटक केलेल्यांपैकी करमजीतसिंह आनंद (२३) मुंबईतील उच्चभ्रू व्यक्तींना अमली पदार्थ पुरवणारा प्रमुख विक्रेता असून त्याचा सुशांत प्रकरणाशी थेट संबंध असल्याचा दावा एनसीबीने केला.

अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, आरोपी करमजीत याच्याकडून गांजा, चरस आणि बंदी घालण्यात आलेले अनेक अंमली पदार्थ जप्त (Raids) करण्यात आले आहेत. एनसीबीच्या पथकाने गांजाचा संशयित पुरवठादार डेव्हन अँथनी फर्नांडिस (Devon Anthony Fernandes) आणि दादर (Dadar) येथील इतर दोघांना ताब्यात (Arrested) घेतले आहे. या तिघांकडून ५०० ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. याशिवाय त्यांनी अशीही माहिती दिली की, अंकुश अरेंजा (Ankush Arenja) (वय २९) नावाच्या व्यक्तीला मुंबईच्या उपनगरातून अटक करण्यात आली आहे.

सुशांतचा नोकर दीपेश (Deepesh) याने चौकशीदरम्यान अँथनीचे नाव घेतले होते. शौविकच्या सूचनेवरून वांद्रे येथील मॉन्टब्लॅक इमारतीखाली आलेल्या अँथनीकडून चरस आणि गांजा घेतल्याचे दीपेशने सांगितले होते. वानखेडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, गोव्यातून ख्रीस कोस्टा या अंमली पदार्थ विक्रेत्याला अटक करण्यात आली. सर्व आरोपींकडून चरस, गांजासह अन्य अमली पदार्थ हस्तगत करण्यात आले आहेत.