sushant sing- shruti modi

मुंबई – सुशांतसिंग राजपूत (Sushant Singh) मृत्यूशी (suicide case) संबंधित ड्रग्ज प्रकरणाची चौकशी पुढे करत एनसीबीने मंगळवारी सुशांतची माजी मॅनेजर श्रुती मोदी (Shruti Modi) आणि रिया चक्रवर्तीची टॅलेंट मॅनेजर जया साहा यांना समन्स बजावले होते. एनसीबीने (NCB ) बुधवारी सकाळी जया आणि श्रुती यांना एनसीबी कार्यालयात चौकशीसाठी (investigate)  बोलावले आहे.

यापूर्वी ईडी आणि सीबीआयनेही श्रुती मोदीची चौकशी केली आहे. जया साहा यांची ईडीने चौकशी केली होती. रियाच्या ड्रग्स चॅटमध्ये जयाचे नाव समोर आले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार २५ नोव्हेंबर २०१९ रोजी रियाने जया साहाला निरोपात लिहिले की, “कॉफी, चहा किंवा पाण्यात फक्त ४ थेंब घाला आणि त्यांना प्यायला द्या. नशा होण्यासाठी तुम्हाला ३० ते ४० मिनिटे वाट बघावी लागेल. ” अशा आशयाचे काही मेसेज सीबीआयच्या हाती लागले आहेत.

सुशांत सिंग राजपूत याची बिझनेस मॅनेजर श्रुति मोदी एनसीबीच्या कार्यालयात पोहचली आहे. तसेच एसआटी ने श्रुतो मोदींची चौकशी सुरु केली आहे. सुशांत मृत्यू प्रकरणी सीबीआय लवकरच एम्स च्या तज्ज्ञांची भेट घेणार आहेत. सुशांतच्या फॉरेंसिक रिपोर्टवर चर्चा होणार असल्याचे समजते आहे.